Join us

कामाच्या व्यापामुळे ‘कॅट’ची अनुपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 21:53 IST

सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा ही आई होणार असून तिची ‘गोदभराई’ ची रसम नुकतीच पार पडली. या सोहळ्याला ...

सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा ही आई होणार असून तिची ‘गोदभराई’ ची रसम नुकतीच पार पडली. या सोहळ्याला सर्व मान्यवर उपस्थित होते. मात्र, खान कुटुंबियांच्या जवळची असणारी कॅटरिना कैफ मात्र अनुपस्थित होती. आता याचे कारण काय हेच तर मुळात वादाचे कारण बनले आहे. अर्पिताच्या बेबी शॉवरला ती का नव्हती? हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. कॅट-रणबीर यांचा ब्रेकअप झाल्यानंतर देखील सलमानसोबतची तिची मैत्री कायम होती. अर्पिताच्या बेबी शॉवर च्या निमित्ताने सलमान आणि कॅ टला भेटता येणार होते पण तरीही कामाच्या व्यापामुळे तिला येता आले नाही. ती ‘काला गोधा फेस्टिव्हल’ मध्ये फितूरच्या प्रमोशनसाठी बिझी होती. एवढी बिझी असून देखील तिने अर्पिताला बेस्ट विशेस पाठवल्या आहेत.