कास्टिंग काऊच : अभिनेत्रींना जाळ्यात ओढण्याचे ‘रहस्य’ उलगडले !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 14:51 IST
चित्रपट सृष्टीत नव्याने येणाऱ्या अभिनेत्रींचे लैंगिक शोषण होणे ही उदाहरणे नव्याने नाहीत. या भावविश्वात चमकण्यासाठी अनेक मॉडेल्स आणि नट्या ...
कास्टिंग काऊच : अभिनेत्रींना जाळ्यात ओढण्याचे ‘रहस्य’ उलगडले !!!
चित्रपट सृष्टीत नव्याने येणाऱ्या अभिनेत्रींचे लैंगिक शोषण होणे ही उदाहरणे नव्याने नाहीत. या भावविश्वात चमकण्यासाठी अनेक मॉडेल्स आणि नट्या तडजोडही करतात. मात्र तडतोड न करणाऱ्याना कसे जाळ्यात ओढले जाते, याचाच खुलासा एका अभिनेत्रीने स्वअनुभवातून दिला आहे. कास्टींग काऊचची शिकार झालेली टीस्का चोप्राने स्वत:वर गुदरलेला प्रसंग मुलाखतीत सांगितला आहे.टीस्का चोप्राला एका निर्माता दिग्दर्शकाने रुममध्ये बोलवले. त्याचा डाव जेव्हा तिच्या लक्षात आला तेव्हा यातून निसटण्याचा प्लॅन तिने कसा बनवला याची गोष्टच टीस्काने सांगितली आहे.अभिनयासाठी संधीच्या शोधात असलेल्या टीस्का चोप्राला एके दिवशी एका निमार्ता दिग्दर्शकाचा फोन आला आणि त्याने आॅफिसमध्ये भेटण्यास बोलवले. त्यावेळी टीस्काने पायात हिल्स घातले होते. ते पाहून तो दिग्दर्शक म्हणाला हिल्स घालून कसे चालतात हे माहिती नाही, तुला अजून खूप शिकायची गरज आहे.टिस्काने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली तेव्हा या दिग्दर्शकापासून सावध राहण्याचा सल्ला सगळ्यांनी दिला. टिस्काला काम हवे होते. पण मित्रांनी दिलेला इशाराही दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. मग तिने या कचाट्यातून वाचण्यासाठी दिग्दर्शकाच्या पत्नीशी आणि मुलाशी मैत्री केली.जोपर्यंत मुंबईत शूटींग सुरू होते तेव्हापर्यंत फारशी अडचण झाली नाही. पण जेव्हा आऊटडोअर शूटींग सुरू झाले तेव्हा मामला बिघडला. काही इंटीमेट सीन्सवर चर्चा करण्यासाठी दिग्दर्शकाने रुममध्ये डिनरसाठी बोलवले. टीस्का घाबरली होती. मग तिने मोठा बुके आणि चॉकलेट घेऊन हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केला.जेव्हा दरवाजा उघडून तिने रुममध्ये प्रवेश केला तेव्हा दिग्दर्शक लुंगी नेसून बसला होता. टीस्काने आत जाताच पहिल्यांदा चॉकलेट दिले आणि बुके देऊन आभार मानले. टीस्का असे काही तरी करेल अशी अपेक्षा त्याची नव्हती. दिग्दर्शकाच्या रुममध्ये येण्यापूर्वी तिला येणारे सर्व फोन कॉल्स दिग्दर्शकाच्या रुममध्ये ट्रान्सफर करण्याची सूचना हॉटेल स्टाफला देऊन आली होती. फिल्म टीमसोबत बाहेर डिनर करण्याचा प्लॅन तिने आधीच बनवला होता त्यामुळे दिग्दर्शकाचा मुलगा फोन करुन सतत बोलवत होता. सतत फोन येत राहिल्यामुळे दिग्दर्शकाची डाळ शिजू शकली नाही आणि या कास्टींग काऊचमधून टीस्का चोप्रा सहीसलामत सुटली.