Join us

​ब्रेकअप झाल्यास जीममध्ये जा- कॅटरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 13:17 IST

कॅटरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपची चर्चा सध्या सर्वत्र गाजत आहे. या ब्रेकअपमुळे तिची मानसिक स्थिती काही अंशी खालावली असली तर ...

कॅटरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपची चर्चा सध्या सर्वत्र गाजत आहे. या ब्रेकअपमुळे तिची मानसिक स्थिती काही अंशी खालावली असली तर तिने यावर उपाय शोधुन काढला आहे. आणि तोच उपाय ती ब्रेकअप झालेल्यांनाही सुचवितेय आणि तो उपाय म्हणजे जीममध्ये जाण्याचा. ‘बार बार देखो’च्या प्रमोशनमध्ये प्रसारमाध्यमांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कतरिना- रणबीरचे ब्रेकअप. पण ‘ब्रेकअपमधून बाहेर पडायचे असेल तर जीममध्ये जा आणि क्रन्चेस मारा,’ असे माध्यमांशी बोलताना ती म्हणाली. आता ती हे स्वानुभवातून बोलते आहे की नुसता संदेश देते हे तर तिचे तिलाच माहित.