Cannes 2017 : सोनम कपूरच्या ‘कान्स लूक’ने सगळेच घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 12:00 IST
७० व्या कान्स फिल्म्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय यांची झलक आपण पाहिलीत. आता दीपिका व ऐश्वर्यानंतर सोनम कपूरचा रेड कार्पेट लूक पाहायला आपण उत्सूक असाल. तुमच्या इतकेच आम्हीही सोनमचा कान्स लूक पाहायला उत्सूक आहोत.
Cannes 2017 : सोनम कपूरच्या ‘कान्स लूक’ने सगळेच घायाळ!
७० व्या कान्स फिल्म्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय यांची झलक आपण पाहिलीत. आता दीपिका व ऐश्वर्यानंतर सोनम कपूरचा रेड कार्पेट लूक पाहायला आपण उत्सूक असाल. तुमच्या इतकेच आम्हीही सोनमचा कान्स लूक पाहायला उत्सूक आहोत. रविवारी रात्री सोनम कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली आणि आपल्या अनोख्या अंदाजाने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एली साबने डिझाईन केलेल्या पिंक डिप नेक डिझाईनर गाऊनमध्ये ती रेडकार्पेटवर आली. या डिपनेक शिफॉन गाऊनमध्ये सोनम अतिशय सुंदर दिसत होती. लांब इअररिंग्स, हलका मेकअप आणि पिंक लिपस्टिक याने तिचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते. त्यापूर्वी शनिवारी सोनम साडी नेसून कानच्या कार्यक्रमात आली होती. कान्समधील तिच्या या हटके आणि देशी अंदाजाने सर्वांना थक्क केले होते. दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन या सौंदर्यवतींनी महोत्सवाला चार चाँद लावले असताना सोनमने साडी नेसून महोत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे केवळ चाहतेच नाही तर कथित प्रियकर आनंद आहुजा हा सुद्धा जाम आनंदात दिसला. त्याला देखील सोनमचा नवा लूक चांगलाच भावला. त्यामुळेच आनंदने इंस्टाग्रामवरुन कान महोत्सवातील सोनमच्या लूकचे अनेक फोटो शेअर केलेत.खरे तर मी कान्ससाठी यंदा काहीही तयारी केली नाहीय, असे सोनम म्हणाली होती. पण रेड कार्पेटवर सोनमचा अंदाज बघून तिच्या या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.सोनम व सोनमची बहीण रिया कपूर या दोघींनी मिळून एक फॅशन ब्रँड लॉन्च केला आहे. सोनम व रियाच्या या फॅशन ब्रँडचे नाव ‘Rheson’ असे आहे.