Join us

Cannes 2017 : ऐश्वर्या रायने तोडला रेड कार्पेटचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 21:07 IST

७०व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा तिने एक महत्त्वपूर्ण नियम तोडल्याची ...

७०व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा तिने एक महत्त्वपूर्ण नियम तोडल्याची बाब समोर आली. ऐश्वर्या राय राल्फ अ‍ॅण्ड रसो यांनी डिझाइन केलेला लाल रंगाचा गाउन परिधान करून रेड कार्पेटवर उतरली होती. मात्र रेड कार्पेटवर सेलिब्रिटींनी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एंट्री करू नये असा महत्त्वपूर्ण नियम आहे; अशात ऐश्वर्याने लाल रंगाचा गाउन घालून केलेली एंट्री वादाच्या भोवºयात सापडली आहे. वास्तविक ऐश्वर्या गेल्या १६ वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे ऐश्वर्या कान्सचे प्रत्येक नियम चांगल्या पद्धतीने जाणून आहे. अशात तिने कान्सचे नियम तोडत केलेली एंट्री वादग्रस्त ठरली आहे. वास्तविक ऐश्वर्याची ही एंट्री अनेकांना अचंबित करणारी होती. शिवाय तिचा ग्लॅमर अंदाजही अनेकांना आवडला, परंतु तिने नियमांचे उल्लंघन केल्याचीही यावेळी जोरदार चर्चा रंगली होती.  दरम्यान, ऐश्वर्याने चौथ्या दिवशी रेड कार्पेटवर एंट्री करताना सगळ्यांनाच आपल्या सौंदर्याने घायाळ केले. मोकळे केस सोडलेली ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या गाउनवर तिने रुबी लावलेले डायमंड एअरिंग घातले होते. शिवाय या गाउनच्या रंगाशी मॅच होणारी लिपस्टिक तिचे सौंदर्य खुलविणारी होती. त्याचबरोबर डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी तिने डोळ्याला हेवी आईलशेस लुक दिला होता. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या लॉरियल पेरिस या ब्रॅण्डला प्रमोट करीत आहे. या वर्षी  तिने दुसºयांदा कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखविल्या. शुक्रवारी तिने मायकल सिन्को याने डिझाइन केलेला पाउडर ब्लू रंगाचा बॉल गाउन ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती प्रिन्ससेससारखी दिसत होती. यावेळी तिने प्रिसेन्स लुकवर कुठल्याही प्रकारची ज्वेलरी घातली नव्हती. त्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले होते. ऐश्वर्याची रेड कार्पेटवरील एंट्री एवढी मनमोहक राहिली की, सगळेच तिला बघण्यासाठी आतुर झाले होते.