Join us

दीपिका ‘ट्रिपल एक्स’ साठी कॅनडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:38 IST

 अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने तिच्या बॅग्ज पॅक केल्या असून ती कॅनडाला रवाना झाली आहे. ती तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल ...

 अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने तिच्या बॅग्ज पॅक केल्या असून ती कॅनडाला रवाना झाली आहे. ती तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटासाठी विन डिजेलसोबत काम करणार आहे. दीपिकाचा बॉयफ्रें ड आणि ‘बाजीराव मस्तानी’ सहकलाकार रणवीर सिंग याने दीपिका हॉलीवूडमधील ‘ट्रिपल एक्स’ साठी कॅनडा येथे रवाना झाल्याचे सांगितले. दीपिकाला ‘ अ‍ॅक्टर आॅफ द ईअर ’ ट्रॉफी तिचे ‘पिकू’ को-स्टार अमिताभ बच्चन आणि पवन मुंजल यांच्याकडून मिळाली. त्यावेळी रणवीर म्हणाला,‘ दीपिका, खरंतर आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो. तू आज शूटिंगसाठी निघतेयस. तुझ्या आगामी हॉलीवूडपटासाठी तू शूटिंग करणार आहेस.’ तिच्या शूटिंगचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. दीपिका मात्र विन डिजेल सोबत काम करण्यास अत्यंत जीव ओतत आहे.