‘दोन अभिनेत्री मैत्रिणी असू शकत नाही का?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 09:52 IST
जॅकलीन फर्नांडिस सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिचा याअगोदर ‘हाऊसफुल्ल ३’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ती आता ...
‘दोन अभिनेत्री मैत्रिणी असू शकत नाही का?’
जॅकलीन फर्नांडिस सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिचा याअगोदर ‘हाऊसफुल्ल ३’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ती आता ‘ढिशूम’ आणि ‘फ्लार्इंग जट’ या दोन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहते आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलतांना ‘बी’ टाऊनमध्ये दोन अभिनेत्री मैत्रिणी असू शकत नाहीत का? असा प्रश्न जॅकलीनने विचारला.त्यावर ती म्हणते,‘ मी आणि सोनम खुप चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यामुळे मलाच तिने प्रत्येक चित्रपट आॅफर केला पाहिजे असे काही नाही ना? आम्ही एकत्र भेटतो, हँगआऊट करतो, पार्टी करतो, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या स्पर्धक असलो तरी खुप चांगल्या मैत्रिणी आहोत. मला ‘वीरें दी वेडिंग’ बद्दल सर्व काही माहिती होते. त्यात कोणाकोणाला घेतले आहे ते देखील मला चांगल्याप्रकारे माहिती होते.करिना कपूर खान, स्वरा भास्कर, टिकू तल्सानिआची मुलगी शिखा यांना चित्रपटात घेण्यात आले आहे. मला डेव्हीड धवनचा ‘जुडवा २’ आणि साजिद नादियाडवालांच्या ‘किक २’ ची आॅफर मिळाली आहे.’