Join us

कॅमेरा ‘फेस’ करायला दिशाला वाटत नाही भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 17:55 IST

 बॉलीवूडचा सध्याचा ‘सीरियल किसर’ टायगर श्रॉफ याची गर्लफ्रेंड आणि ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ ची हिरोईन दिशा पाटणी सध्या तिच्या ...

 बॉलीवूडचा सध्याचा ‘सीरियल किसर’ टायगर श्रॉफ याची गर्लफ्रेंड आणि ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ ची हिरोईन दिशा पाटणी सध्या तिच्या व्हिडीओ आणि चित्रपटामुळे भलतीच चर्चेत आहे. ‘बेफि क्रा’ मध्ये तिने टायगरसोबत केलेला डान्स हा कधीही विसरण्यासारखा नाहीये नाही का? त्यात ती किती सुंदर दिसते? तर तिने जॅकी चॅनसोबतही एक आंतरराष्ट्रीय चित्रपट केला आहे.पण आता ती ‘एम.एस.धोनी -द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहतेय. ती म्हणते,‘ जेव्हा तुमचे आयुष्य हे नॉन बॉलीवूड संबंधित असते. तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट फेस करावी लागते. त्यामुळे तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास येतो तो तुम्हाला कोणत्याही बाबतीत यशच मिळवून देतो.त्यामुळे मला कॅमेºयाला सामोरे जायला कधीही भीती वाटली नाही. आजही चित्रपट कुठला आहे त्यापेक्षा त्याचे काय कथानक आहे आणि माझी भूमिका काय असणार? याकडे माझे जास्त लक्ष असते.’