Join us

​बजेट कमी तरी बॉक्स आॅफिसवर झाले सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 17:36 IST

सध्या एखादा चित्रपट १०० करोडच्या पुढे गेला कि तो बॉकस आॅफिसवर यशस्वी झाला, सुपरहिट झाला असे समजले जाते. परंतू ...

सध्या एखादा चित्रपट १०० करोडच्या पुढे गेला कि तो बॉकस आॅफिसवर यशस्वी झाला, सुपरहिट झाला असे समजले जाते. परंतू चित्रपट हा हिट कि फ्लॉप हे त्या चित्रपटाच्या बजेटवरुनच ठरविले जाते. बॉलिवूडमध्ये अनेक निर्माते - दिग्दर्शक असे आहेत कि जे आपल्या चित्रपटावर पाण्यासारख्या पैसा खर्च करतात. पण तरी देखील चित्रपट बॉक्स आॅफिसवर साफ आपटतो. तर काही चित्रपटांचे बजेट जरी कमी असले तरी या चित्रपटांनी प्रेक्षकाच्या मनावर आणि बॉकस आॅफिसवर आपली छाप उमटविली आहे. २०१६ या वर्षातील अशाच काही कमी बजेट असलेल्या पण तरीही बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरलेल्या काही चित्रपटांवर आप नजर टाकूयात. अक्षय कुमार नेहमीच वेगळे आणि दर्जेदार चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. अक्षयचे या वषार्तील सलग दोन चित्रपट बॉकस आॅफिसवर सुपरहिट ठरलेले आहेत. एअरलीफ्ट आणि रुस्तम या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. नीरजा या चित्रपटाची देखील या वर्षी चांगलीच चर्चा झाली. सोनम कपूरला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले. तसेच हा सिनेमा सुपरहिट ठरला. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला पिंक या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही ग्रीन सिग्नल दाखविला होता. कहानी २ या विदया बालनच्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी पसंत केले. या वर्षी अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. परंतू कमी बजेट असलेल्या काही निवडक चित्रपटांचा घेतलेला हा आढावा आपण पाहूयात. पाहा कमी बजेट असलेले पण तरीही बॉक्स आॅफिसवर सुपरहिट झालेले २०१६ मधील काही चित्रपट :एअरलीफ्ट :रुस्तम :नीरजा :पिंक :बागी :सरबजीत :फोर्स २ :सनम रे :