Join us
Daily Top 2Weekly Top 5

नववधू समांथा हिचा लग्नातला डिझायनर लेंहगा आणि ताजमहलचं हे आहे कनेक्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 10:33 IST

दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुन याचा लेक चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू शुक्रवारी रेशीमगाठीत अडकलेत. एका राजेशाही आणि तितक्याच शानदार ...

दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुन याचा लेक चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू शुक्रवारी रेशीमगाठीत अडकलेत. एका राजेशाही आणि तितक्याच शानदार सोहळ्यात चैतन्य आणि समांथाचा लग्न सोहळा पार पडला. नवदाम्पत्याचा लूक, राजेशाही थाटातील सोहळा, दागदागिने आणि दिग्गजांची उपस्थिती यामुळे हा सोहळा वर्षभरातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी लग्नसोहळा ठरला आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्च या सोहळ्यावर खर्च झाल्याचं बोललं जात आहे. या सोहळ्यात सा-यांचं लक्ष वेधून घेतलं ते नववधू समांथा रुथ प्रभू. कुणाचीही नजर लागावी असाच काहीसा लूक नवरी मुलगी समांथाचा होता. या सोहळ्याचं प्रमुख केंद्रस्थान समांथाच ठरली. तिच्या सौंदर्यासह, आऊटफिट आणि दागदागिने सारंच काही लक्षवेधी ठरलं. समांथासाठी या लग्नसोहळ्यात परिधान करण्यासाठी विशेष ड्रेस डिझाईन करण्यात आला होता. या आऊटफिटमध्ये समांथांचं सौंदर्य आणखीनच खुलून गेलं होतं. डिझायनर क्रिश बजाज समांथासाठी हा खास डिझायनर लेंहगा तयार केला होता. सोनं आणि हलकीशी चांदी याचा वापर करुन हा लेंहगा डिझाईन करण्यात आला होता. रेशीमगाठीत अडकण्यापूर्वी चैतन्य आणि समांथा यांचं बराच काळ अफेअर सुरु होतं. दोघांमध्ये प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत या दोघांच्या रोमान्स आणि अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. चैतन्य आणि समांथाच्या याच प्रेमाची आणि रोमान्स याचा विचार करुनच समांथाचा लेंहगा डिझाईन करण्यात आला होता. प्रेमाचं प्रतीक म्हणून ज्या वास्तूची ओळख आहे अशा ताजमहलची झलक या लेंहग्यावर पाहायला मिळाली. या लेंहग्याला लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला त्यावर प्रेमाचं प्रतिक असलेली ताजमहलचं नक्षीकाम दिसून आले. त्यामुळे या राजेशाही सोहळ्यात समांथाचा हा लेंहगा सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. समांथानं हा लेंहगा फॉर्मल सोहळ्यासाठी परिधान केला होता. लग्नाआधी समाथांचा हा लेंहगा चर्चेचा विषय ठरला होता. यावर ताजमहलचं नक्षीकाम असल्याने समांथाला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं होतं. तरीही समांथाना हाच लेंहगा परिधान केला. तर पारंपरिक सोहळ्यात समांथानं साडी परिधान केली होती. ही साडी थोडी विशेष होती असंच म्हणावं लागेल. कारण समांथानं परिधान केलेली साडी ही नागा चैतन्यच्या आजीची होती. त्यामुळे या राजेशाही विवाह सोहळ्याचे क्या कहेने असंच तुम्हीही म्हणाल.Also Read:नागार्जुनची ‘ती’ सून जी एकेकाळी बनली होती त्याची ‘ऑनस्क्रीन आई,जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा