Breaking News : राजामौलींची घोषणा; ‘बाहुबली’चा तिसरा भागही येणार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 16:22 IST
नऊ दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉलिवूडमध्ये कित्येक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आमिर खानच्या ‘दंगल’ आणि सलमान ...
Breaking News : राजामौलींची घोषणा; ‘बाहुबली’चा तिसरा भागही येणार!!
नऊ दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉलिवूडमध्ये कित्येक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आमिर खानच्या ‘दंगल’ आणि सलमान खानच्या ‘सुलतान’ला धक्का देत ‘बाहुबली’ने मारलेली मुसंडी निर्मात्यांना धडकी भरविणारी आहे. अशात बाहुबलीचा तीसरा भाग येणार काय? या प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नाला आता दस्तुरखुद्द एस. एस. राजामौली यांनीच उत्तर दिले आहे. ‘बाहुबली’चा तिसरा भाग येईल असे त्यांनी संकेत दिले आहेत. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक असलेल्या एस. एस. राजामौली यांनी आपल्या सोशल अकाउंटवरून लिहिले की, ‘सध्या बाहुबलीचे मार्केट आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा योग्य पद्धतीने न दाखविल्यास या चित्रपटावर अन्याय होईल. जर मााझ्या वडिलांकडे चित्रपटाच्या तिसºया भागाची एखादी चांगली कथा असेल तर मी नक्कीच ‘बाहुबली-३’ बनविणार.’ खरं तर राजामौली यांनी २०१५ मध्येच ट्विट करून ‘बाहुबली-३’ची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘बाहुबली-३’ची निर्मिती करणार, मात्र त्यात ‘बाहुबली-२’ची कथा नसेल. त्यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले होते की, ‘बाहुबली-२’मध्येच बाहुबलीची कथा संपणार आहे. त्यामुळे तिसरा भाग बनवायचा झाल्यास नवी कथा लिहिली जाईल. प्रभास स्टारर ‘बाहुबली-२’चा अजूनही बोलबाला आहे. चित्रपटाने आठच दिवसांत बॉक्स आॅफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची इतिहासात नोंद झाली आहे. शिवाय गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडवर राज करीत असलेल्या तिन्ही खानांना काहीतरी हटके करावे लागेल असेच जणू काही संकेत दिले आहेत. आता हा चित्रपट किती कोटींपर्यंत मजल मारू शकेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या वर्ल्डवाइड कलेक्शननुसार या चित्रपटाने ८०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आता या चित्रपटाला एक हजार कोटी रुपयांचे वेध लागले असून, हा आकडाही चित्रपट सहज पार करेल असेच काहीसे चित्रपट दिसत आहे. देशातील बºयाचशा भागात अजूनही हा चित्रपट हाउसफुल असल्याने तिसºया भागाचा विचार केल्यास नवल ठरू नये.