Join us

कंगणाच्या यशस्वी प्रवासाचा साक्षीदार ‘व्हिडीओ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 21:26 IST

कंगणा राणावत ही सध्या तिच्या करिअरच्या अत्युच्च टोकावर उभी आहे. 

कंगणा राणावत ही सध्या तिच्या करिअरच्या अत्युच्च टोकावर उभी आहे. अतिशय छोट्या खेड्यातून आलेली मुलगी जिला इंडस्ट्रीत काय चालते काय नाही? याची कसलीच माहिती नाही. मात्र, तीच आता अनेक पुरस्कारांची धनी होऊन बसलीय. तिने तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या कलाकारांसोबत काम केले. पण, तिने हार्डवर्क आणि वर्कआऊट वर आधारित नुकताच एक व्हिडीओ शूट केला आहे.ज्यासाठी तिने काही दिवसांपूर्वी खुप आरडाओरड केली होती. ज्यात तिचे दिग्दर्शक म्हणत होते की, तिला बॉडी डबलची गरज आहे. पण तिने त्याला अमान्य करत हा व्हिडिओ स्वत: केला. ती इंडस्ट्रीतील सर्वांत फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. रिबॉक ही कंपनीने महिलादिनी भारतीय महिला किती स्ट्राँग असतात हे दाखवण्यासाठी हा व्हिडीओ त्यांच्यासाठी बनवला. हा व्हिडीओ कंगणाच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. ती जणू काही आपल्याला फिटनेसच्या काही टिप्स देते असे वाटते.