दिल्ली महापालिका संजयला बनवू इच्छिते ब्रॅण्ड अॅम्बेसीडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 06:18 IST
मुंबई बॉम्बस्फोट मालिकेदरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४२ महिन्यांची शिक्षा भोगून घरी परतलेला अभिनेता संजय दत्तचे नशीब सध्या जोरावर आहे. ...
दिल्ली महापालिका संजयला बनवू इच्छिते ब्रॅण्ड अॅम्बेसीडर
मुंबई बॉम्बस्फोट मालिकेदरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४२ महिन्यांची शिक्षा भोगून घरी परतलेला अभिनेता संजय दत्तचे नशीब सध्या जोरावर आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्याच्या पुढ्यात अनेक दिग्गज दिग्दर्शकांचे सिनेमे आहेत. एवढे कमी की काय, म्हणून दिल्ली महानगरपालिकेने संजयला स्वच्छ भारत अभियान व स्मार्ट सिटी अभियानाचा ब्रॅण्ड अॅम्बेसीडर नेमण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहे. दिल्ली महानगरपालिकेने संजयला एका पत्राद्वारे विचारणा केली आहे. तुम्ही तरूणाईचा आदर्श व लोकप्रीय व्यक्तिमत्त्व आहात. स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटी मोहिमांमध्ये आपण सहभागी झाल्यास आम्हास आनंद होईल, असे या पत्रात म्हटले गेले आहे. आता संजय ही आॅफर स्वीकारतो की नाकारतो, हे येत्या दिवसात दिसेलच!