कंगना राणौतच्या 'मणिकार्णिका'ला होणारा ब्राम्हण महासभेचा विरोध मावळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:00 IST
कंगना राणौतचा आगामी चित्रपट मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीच्या मेकर्सनी सुटकेचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राम्हण ...
कंगना राणौतच्या 'मणिकार्णिका'ला होणारा ब्राम्हण महासभेचा विरोध मावळला
कंगना राणौतचा आगामी चित्रपट मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीच्या मेकर्सनी सुटकेचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राम्हण समाजातील काही लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करित होते. मात्र त्यांनी आपला विरोध मागे घेतला आहे. मणिकर्णिकाचा निर्माता कमल जैन यांने नुकतीच प्रेस कॉन्फ्रेस बोलवली होती. 'ज्याठिकाणी सर्व ब्राम्हण समाज'मधील सर्व सदस्य उपस्थित होते. यानंतर चित्रपटाच्या मेकर्सनी ब्राम्हण समाजाला एक लिखित आश्वासन दिले ज्यात चित्रपटात इतिहास सोबत कोणतीच छोडछाड करण्यात आलेली नाही. कमल प्रसिद्ध केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, या चित्रपटात इतिहासासोबत कोणतीच छेडछाड करण्यात आलेली नाही. तसेच चित्रपट इंग्रजांसोबत कोणत्याच प्रकारचा रोमाँटिक सीक्वेंस किंवा ड्रामा सीक्वेंस नाही. चित्रपटाच्या निर्मात्याने आश्वासन दिल्यानंतर 'ब्राम्हण समाजा'ने चित्रपटाला असलेला आपला विरोध मागे घेतला आहे. त्याचे झाले असे की चित्रपटाच्या शूटिंग बिकानेरला सुरु होण्याआधी राजस्थानच्या सर्व ब्राह्मण महासभा या सामाजिक संघटनेने या चित्रपटाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ मध्ये राणी लक्ष्मीबाईचे प्रेमसंबंध दाखवण्यात आल्याचा दावा या संघटनेने केला असून याला विरोध म्हणून राजस्थानात या चित्रपटाचे शूटींग हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे. सर्व ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केले होते. त्यानंतर आता निर्मात्यांने ही पत्रक जारी करुन लेखी आश्वासन दिले आहे. ALSO READ : कंगना राणौतला भासू लागली जोडीदाराची उणीव! पुढीवर्षी फेब्रुवारीत वाजणार सनई चौघडे!!'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत.