रॅम्प वॉक करतानाचा एक फोटो शेअर करीत बॉयफ्रेंड आनंद आहूजा याने ‘रिअल लाइफ प्रिन्सेस’ असे कॅप्शन दिले. वास्तविक सोनम आणि आनंद यांनी त्यांच्यातील नाते कधीच लपवून ठेवले नाही. बºयाचदा हे दोघे पार्टी तसेच इव्हेंटमध्ये एकत्र झळकले आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघे लंडन येथे सुट्या एन्जॉय करताना बघावयास मिळाले होते. सोनम स्वत:च तिच्या पर्सनल लाइफविषयी पझेसिव्ह असल्याने तिला सर्वसामान्य मुलीप्रमाणे आयुष्य जगायला आवडते. आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट सीक्रेट नसावी, असा विचार करून ती नेहमीच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करीत असते.
दरम्यान, या फॅशन विकमध्ये सोनमने छाप सोडली असून, तिच्या सौंदर्याचे सगळ्यांनीच कौतुक केले. सोनमची रॅम्पवरील एंट्री चर्चेचा विषय ठरल्याने, सोनम इंटरनॅशनल मीडियामध्ये चर्चेत आहे. यापूर्वीदेखील सोनमने अनेक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला आहे. प्रत्येकवेळी तिने आपल्या हटके स्टाइलने अनेकांना घायाळ केले आहे. ‘नीरजा’ या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड जिंकणारी सोनम लवकरच ‘पॅडमॅन’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे.