सोमवार सकाळपासून ट्विटरवर ‘बायकॉट कंगना’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि कंगना राणौत ट्रोल झाली. आता ट्रोल होतेय म्हटल्यावर गप्प बसणार ती कंगना कुठली? ‘बायकॉट कंगना’ म्हणणाऱ्यांवर ती चांगलीच बरसली. केवळ बरसलीच नाही तर, ‘उंदरांनो, आपल्या बिळात परत जा,’ अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावले.
‘चूहों वापस बिल में चले जाओ वरना गब्बर आ जाएगा... फिल्मी स्टाइल हूल देनी है तो ऐसे देते है,.... ट्रेंड से मुझे डर नहीं लगता... जाओ कुछ और ट्राई करो...,’ असे ट्विट कंगनाने केले.या ट्विटसोबत कंगनाने एक ग्राफिकही शेअर केले. या ग्राफिममध्ये रणबीर कपूर, करण जोहर, आलिया भट, वरूण धवन यांना व्हायरस म्हटले आहे तर कंगनाला सॅनिटाइजर म्हटले आहे.
त्याआधीच्या एका ट्विटमध्येही तिने ‘बायकॉट कंगना’ म्हणणाऱ्यांना लक्ष्य केले. ‘बढिया.... ट्रेंडिंग... चूहे बिलों से बाहर आ रहे हैं, चलो थोडा हाथ पैर तो माफिया भी मारेगी,’ असे तिने लिहिले.
का ट्रोल होतेय कंगनाबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा म्हणून अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर जोरदार मोहिम सुरु केलीय. पण सुशांतच्या फॅमिली वकीलांनी कंगनाच्या या मोहिमेतील जणू हवाच काढून घेतली. सुशांतचे फॅमिली वकील विकास सिंग यांनी कंगनावर असा काही ‘वार’ केला की, ट्विटरवर ‘बायकॉट कंगना राणौत’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. कंगना ना सुशांतची प्रतिनिधी आहे, ना मित्र. ती केवळ इंडस्ट्रीतील समस्या समोर आणतेय. होऊ शकते सुशांतला सुद्धा नेपोटिजमचा फटका बसला असेल. पण सध्या कंगना जे काही करतेय ते सुशांतसाठी नाही तर स्वत:साठी करतेय, असे विकास सिंह म्हणाले. यानंतर अनेकांनी कंगनाला ट्रोल करत तिला संधीसाधू म्हणत टीका केली.