Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुन-सासºयांत ‘बॉक्सआॅफीस’ टस्सल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:09 IST

मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्यात बॉक्स आॅफीसवर चांगलीच टक्कर होणार आहे. ऐशचा आगामी चित्रपट ...

मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्यात बॉक्स आॅफीसवर चांगलीच टक्कर होणार आहे. ऐशचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ आणि अमिताभ बच्चनचा आगामी चित्रपट ‘टीन’ हे एकाच दिवशी रिलीज होणार आहे.हे दोन्ही चित्रपट यावर्षीचे सर्वांत महत्त्वाचे चित्रपट आहेत. आत्तापर्यंतच्या बॉलीवूडच्या इतिहासात एका सुपरस्टारची सून आणि सासरे यांच्यात बॉक्सआॅफीसवर टक्कर होणार आहे. ‘सरबजीत’ ही सरबजीत सिंग यांची बायोपिक असणार आहे. तर ‘टीन’ हा चित्रपट अमिताभ, विद्या बालन, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटांविषयी अत्यंत उत्सुकता सध्या इंडस्ट्रीत आहे.