‘टायगर जिंदा है’ने सलमान खानच्या सर्वाधिक कमाई करणाºया ‘बजरंगी भाईजान’ला मागे टाकले आहे. या चित्रपटाने जवळपास ३२० कोटी रूपयांची कमाई केली होती. एकूणच मोठ्या पडद्यावर सध्या सलमान खान जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसत आहे, तर छोट्या पडद्यावरही त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. ‘बिग बॉस’ या सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शोचा एक सर्वोत्कृष्ट होस्ट म्हणून त्याला ओळखले जाते. आता लवकरच तो छोट्या पडद्यावर ‘१० का दम’ हा शो घेऊन येत आहे.
#TigerZindaHai [Week 4] Fri 1.46 cr, Sat 2.12 cr, Sun 3.27 cr, Mon 1.36 cr, Tue 1.02 cr, Wed 88 lakhs. Total: ₹ 328.97 cr. India biz. BLOCKBUSTER.— taran adarsh (@taran_adarsh) January 18, 2018
दरम्यान, सलमानच्या ‘टायगर जिंदा है’चा बॉक्स आॅफिसवरील दबदबा पाहता हा चित्रपट बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्या ‘पीके’ या चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक करेल असे चित्र दिसत आहे. असे झाल्यास आगामी काळात आमिर खान सलमानला कशी फाइट देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.