Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘कुंग फू योगा’ला बॉलिवूडचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 06:50 IST

अभिनेता सोनू सूद लवकरच एका इंडो-चायनीज चित्रपटात झळकत आहे. ‘कुंग फू योगा’ नावाच्या या चित्रपटात बॉलिवूड स्टाईल गाणे असणार आहे. ...

अभिनेता सोनू सूद लवकरच एका इंडो-चायनीज चित्रपटात झळकत आहे. ‘कुंग फू योगा’ नावाच्या या चित्रपटात बॉलिवूड स्टाईल गाणे असणार आहे. सोनू सध्या अ‍ॅक्शनपटांचा सुपरस्टार जॅकी चॅनसोबत ‘कुंग फू योगा’मध्ये काम करीत आहेत. या चित्रपटात एक बॉलिवूड स्टाईल साँग असावे, अशी सोनूची इच्छा होती. मग काय, सोनूने ही इच्छा चित्रपटाच्या निर्मात्यासह दिग्दर्शक स्टेनली टोंग यांना सांगितली आणि विशेष म्हणजे या दोघांना त्याने पटवलेही. चित्रपटात बॉलिवूड स्टाईलचे गाणे असल्यामुळे भारतीय प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षित होईल, हा सोनूचा युक्तिवाद होता.जॅकी आणि स्टेनली यांना सोनूचा हा युक्तिवाद नेमका पटला आणि मग काय, चित्रपटात बॉलिवूड स्टाईल साँगला परवानगी मिळाली.  सोनू, जॅकी आणि अभिनेत्री अमायरा दस्तूर व दिशा पाटनी यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले. यात भारतीय आणि चीनी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.