Join us

बॉलिवुडचं 'नाटू नाटू'! अक्षय - टायगरचं 'मस्त मलंग झूम' गाण्यात जबरदस्त थिरकले, तुम्हीही बघा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:27 IST

अक्षय - टायगर श्रॉफच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमातील नवं गाणं भेटीला आलंय

अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय - टायगर पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकमेकांसमोर येत आहेत. अक्षय - टायगरच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमातील नवीन गाणं भेटीला आलंय. 'मस्त मलंग झूम' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं बघून लोकांना RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याची आठवण आली.

'बडे मिया छोटे मिया' सिनेमातील 'मस्त मलंग झूम' गाण्यात अक्षय - टायगर एका पार्टीत दिसत आहेत. या पार्टीत दोघेही जल्लोष करताना दिसत आहेत. याच गाण्यात अक्षय - टायगरने एक स्टेप केलीय ज्यामुळे RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याची आठवण प्रेक्षकांना आलीय. अक्षय - टायगरने पायांची खास स्टेप करत एकत्र डान्स केलाय. याच गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा खास अंदाज दिसून येतोय.

पूजा एन्टरटेंनमेंट निर्मित 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे.  'बडे मिया छोटे मिया' एप्रिल मध्ये ईदच्या मुहुर्तावर रिलीज होतोय. सिनेमात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, पृथ्वीराज या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ९ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा रिलीज होतोय.

टॅग्स :अक्षय कुमारटायगर श्रॉफसोनाक्षी सिन्हा