Join us  

बॉलिवूडच्या मजनूभाईची दिल्ली हायकोर्टात धाव, न्यायालयाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 3:21 PM

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या नावाचा आणि आवाजाचा वापर करण्यात येतो

मुंबई - मिस्टर इंडिया, वेलकमचा मजनूभाई म्हणजे बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा वाजवला आहे. आपल्या व्यक्तित्वाच्या अधिकाराची सुरक्षा आणि संरक्षणासंदर्भात अनिल कपूरने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डिजिटलच्या जमान्यात सोशल मीडियात अनिल कपूर यांचा नावाचा किंवा आवाजाचा वापर करुन चुकीच्या पद्धतीने प्रमोट केलं जातं, असे म्हणत अनिल कपूर यांनी व्यक्तिमत्त्व अधिकाराचा वापर करत कोर्टात धाव घेतली आहे. 

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या नावाचा आणि आवाजाचा वापर करण्यात येतो. काही ठिकाणी फोटोही वापरला जात आहे. त्यामध्यमातून आपल्या समाजिक प्रतिष्ठेला धोका निर्माण झाल्याचं अनिल कपूर यांनी याचिकेत म्हटलं आहे. तसेच, हे बेकायदेशीर असल्याचे सांगत याप्रकरणी न्यायालायने योग्य तो निर्णय देण्याची मागणी अभिनेत्याने केली आहे. 

अनिल कपूरच्या या याचिकेत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह जॉन, डज येथेही त्यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म वापरुन AK, आणि चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिकेतील कॅरेक्टरचे नाव वापरुन, उदा: लखन, मजनूभाई, मिस्टर इंडिया, बोले तो झक्कास.. अशा शब्दांचा प्रयोग केला जातो. विशेष म्हणजे यासाठी संबंधित कंपन्यांकडून अनिल कपूरची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे, न्यायालयाने याची गंभीर दखल घेत निर्णय द्यावा आणि समाजात एक उदाहरण सेट करावं, अशी मागणीही अभिनेत्याने याचिकेतून केली आहे. 

दरम्यान, उच्च न्यायालयाने अनिल कपूर यांच्या याचिकेवर सुनावणी करत तात्काळ आदेशही जारी केले आहेत. त्यानुसार, अनिल कपूर यांचं नाव किंवा फोटो न वापरण्याचे बजावले आहे. त्यामुळे, यापुढे अनिल कपूरच्या नावाचा किंवा फोटोचा विनापरवाना वापर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा कंपनीला कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागेल. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीही व्यक्तीत्व अधिकारासाठी न्यायालयात धाव घेतली होती. 

टॅग्स :अनिल कपूरउच्च न्यायालयबॉलिवूडसोशल मीडिया