Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडला काश्मिरी टच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 09:04 IST

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’चा सरळ संबंध काश्मिरच्या संंस्कृती व परंपरेशी आहे. बॉक्स आॅफिस ‘फितूर’चे भविष्य कसेही असले तरी काश्मिरी ...

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’चा सरळ संबंध काश्मिरच्या संंस्कृती व परंपरेशी आहे. बॉक्स आॅफिस ‘फितूर’चे भविष्य कसेही असले तरी काश्मिरी चित्रपटांच्या यादीत समावेश होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते.60-70 च्या दशकातील हिंदी चित्रपटांच्या कथा काश्मिरशी संबंधीत होत्या. मात्र 80 च्या दशकाच्या शेवटी मात्र हे समिकरण बदलत गेले. यासाठी येथील दहशतवादी कारवाया कारणीभूत मानल्या जातात. 90 व्या दशकात काश्मिरविषयक चित्रपट निर्माण होऊ लागले. यांचा विषय येथील दहशतवादी कारवायांशीच होता. मणिरत्नमचा ‘रोजा’ हा चित्रपट महत्त्वपूर्ण मानला जातो. या चित्रपटाने काश्मिरसोबत बॉलिवूडचे नाते पून्हा जूळले.  विंधू विनोद चोपडांचा ‘मिशन कश्मीर’, मणिशंकरचा ‘लम्हा’, राजकुमार संतोषीचा ‘पुकार’ ने या प्रकरणाचा पूढे सुरू ठेवले. या यादीत ‘सिकंदर और ताहन’ सारखे लहान बजेटचे चित्रपटदेखील समाविष्ट आहेत. विशाल भारद्वाजने शाहिद कपूरला घेऊन ‘हैदर’ बनविला. मात्र ‘फितूर’ असा चित्रपट आहे की, त्यात आतंकवाद नसून तेथील संस्कृ ती आणि नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकतो.