Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची ‘ही’अभिनेत्री बनणार दुसऱ्यांदा आई? चाहत्याने सोशल मीडियावर व्हायरल केला फोटो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 17:23 IST

ऐश्वर्या आता एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय. ती म्हणजे गोव्यातील तिच्या आणि अभिषेकच्या एका फोटोमुळे. तिच्या एका चाहत्याने गोव्यातील एका बीचवर अभि-ऐश फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूडचे ऐश्वर्य म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या कुठल्याही प्रोजेक्टच्या संदर्भात चर्चेत नाही. शिवाय तिचा पती अभिषेक बच्चन याच्याकडेही सध्या कुठला प्रोजेक्ट नाहीये. पण, होय, ऐश्वर्या आता एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय. ती म्हणजे गोव्यातील तिच्या आणि अभिषेकच्या एका फोटोमुळे. तिच्या एका चाहत्याने गोव्यातील एका बीचवर अभि-ऐश फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ऐश्वर्या रॉय बच्चन ही लवकरच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देऊ शकते, असं दिसतंय.

 झाले असे की, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सध्या गोवा येथे क्वालिटी टाइम घालवत आहेत. तेव्हा एका चाहत्याने ते दोघे बीचवर फिरतानाचा त्यांचा खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात ऐश्वर्या रॉयचे बेबी बम्प दिसत आहे. तिने हाफ स्लिव्हजचा कुर्ता आणि गुलाबी रंगाची शॉर्टस घातलेली दिसत आहे. या तिच्या फोटोमुळे ती आता पुन्हा चर्चेत आल्याचे समजतेय. आराध्यानंतर ते दुसऱ्या अपत्याचा विचार करत असल्याचे समजतेय. 

ऐश्वर्या रॉय बच्चन ही तिची मुलगी आराध्या हिच्याबाबतीत खूपच काळजी करते, असे अनेक वेळेला दिसून आले आहे. प्रेस शोज किंवा स्क्रिनिंगच्यावेळेलाही ती पापाराझींपासून आराध्याला दूर ठेवत असते. ‘ती अजून लहान आहे. तिला बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेची अद्याप ओळख नाही, असे ती कायम माध्यमांना सांगते.’ आता ती नक्कीच तिच्या दुसऱ्या  अपत्याच्या बाबतीतही तेच करणार यात काही शंका नाही. ऐश आणि अभिषेक दुसऱ्यांदा आई-बाबा होणार हे अर्थात त्यांच्याकडून समजत नाही तोपर्यंत आपण नक्कीच वाट बघूया.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनगोवा