Join us

ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड तारे-तारकांचा जलवा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

‘आयफा २०१७’ या न्यूयॉर्क येथील रंगतदार सोहळ्यात ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडच्या तारे-तारकांनी त्यांचा जलवा दाखवून दिला. स्टायलिश अंदाज, ग्लॅमरस लूक आणि चेहऱ्यावरचे हसू हे या सेलिब्रिटींमध्ये अगदीच कॉमन गोष्ट पाहायला मिळाली. न्यूयॉर्कमधील भारतीयांना आपल्या डोळ्यांनी सेलिब्रिटींना ग्रीन कार्पेटवर पाहण्याचे नयनसुख मिळाले. पाहूयात, या सेलिब्रिटींचा हा जलवा फोटोंच्या माध्यमातून...

‘आयफा २०१७’ या न्यूयॉर्क येथील रंगतदार सोहळ्यात ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडच्या तारे-तारकांनी त्यांचा जलवा दाखवून दिला. स्टायलिश अंदाज, ग्लॅमरस लूक आणि चेहऱ्यावरचे हसू हे या सेलिब्रिटींमध्ये अगदीच कॉमन गोष्ट पाहायला मिळाली. न्यूयॉर्कमधील भारतीयांना आपल्या डोळ्यांनी सेलिब्रिटींना ग्रीन कार्पेटवर पाहण्याचे नयनसुख मिळाले. पाहूयात, या सेलिब्रिटींचा हा जलवा फोटोंच्या माध्यमातून...अभिनेता आदित्य रॉय कपूरला पाहताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटोसेशन, सेल्फी काढायला सुरूवात केली. त्यालाही चाहत्यांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.पांढऱ्या रंगाचा स्टायलिश ड्रेसमध्ये नेहा धूपियाने ग्रीन कार्पेटवर एन्ट्री केली. ती येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचे सौंदर्य या ड्रेसमध्ये अधिक खुलून दिसत होते.बिपाशा बसु ही एरव्हीच तिच्या अदांनी लोकांना घायाळ करते. मग इथे तर आयफाचा सोहळा आहे. तिचा लूक आणि तिचा अंदाज खरंच पाहण्यासारखा होता. ब्लॅक ड्रेसमधला तिचा हा अंदाज कुणालाही प्रेमात पाडेल असाच होता.पिंक कलरच्या सुंदर ड्रेसिंगमध्ये हुमा कुरैशीने ग्रीन कार्पेटवर एन्ट्री केली. तिचा हा लूक पाहण्यासारखा होता.नर्गिस फाखरी हिचा हॉट अंदाज या ग्रीन कार्पेटवर लक्षवेधी ठरला. मरून रंगातील ड्रेसमुळे तिचे सौंदर्य जास्तच खुलून दिसले.करणसिंग ग्रोव्हरने अशा स्टायलिश अंदाजात कार्पेटवर एन्ट्री घेतली.रितेश देशमुखनेही ब्लेझरमध्ये हॅण्डसम पोझ दिली.वरूण धवनलाही त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.एव्हरग्रीन ब्युटी दिया मिर्झा हिने अशा आगळ्यावेगळया ड्रेसप्रकारात येथे हजेरी लावली.शिल्पाच्या या हॉट अदा उफ़..असंच म्हणण्याची काहीशी वेळ येथे उपस्थित चाहत्यांवर आली. पाहा तिचा हा हॉट अंदाज...अभिनयाची उत्तम जाण असलेली अभिनेत्री ऋचा चढ्ढा न्यूयॉर्कमधील ग्रीन कार्पेटवर अशी क्यूट दिसत होती.पती जेने गुडनग याच्यासोबत प्रिती झिंटा हिने हजेरी लावली होती.कैलाश खेर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी अशा हॅण्डसम अंदाजात उपस्थिती नोंदवली.कल्की कोचलिन हिने तिच्या न्यूयॉर्कच्या चाहत्यांसोबत सेल्फी सेशनचा आनंद लुटला.अनिल कपूर याने अशी झक्कास पोझ देऊन फोटोग्राफर्सना खुश केले.जायेद खान अशा कूल अंदाजात या ग्रीन कार्पेटवर दिसून आला.सोनाक्षी सिन्हा हिने कलरफुल साडीत या ग्रीन कार्पेटवर एन्ट्री केली.