Join us  

CoronaVirus : बॉलिवूड निर्माते करीम मोरानी हेही कोरोना पॉझिटीव्ह, रूग्णालयात भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 4:20 PM

धक्कादायक!!

ठळक मुद्दे मोरानी हे बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे.   दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बॉलिवूडची सिंगर कनिका कपूरनंतर बॉलिवूड निर्माते करीम मोरानी हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.चेन्नई एक्स्प्रेस, राजा हिंदुस्तानी, हॅपी न्यू ईअर असे अनेक सिनेमे प्रोड्यूस करणारे करीम मोरानी यांच्या दोन्ही मुली  सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आहेत. दोन्ही मुली कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर करीम मोरानी यांचीही टेस्ट केली गेली. यात ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. तूर्तास मोरानी यांना मुंबईच्या नानावटी रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

करीम यांची मुलगी शजा मोरानी हिच्यात सर्वप्रथम कोरोनाची लक्षणे आढळली होती. तिची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दुसरी मुलगी जोआ मोरानी हिचीही टेस्ट केली गेली. तिची टेस्टही पॉझिटीव्ह आली. आता करीम हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. आता करीम यांच्या कुटुंबातील सर्व नऊ सदस्यांची कोरोना चाचणी होणार असल्याचे कळतेय.तिघेही जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईत ते राहत असलेली बिल्डींग पूर्णपणे सील करण्यात आली आहे.

या सगळ्यात शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाचे निमार्ते करीम मोरानी यांची मुलगी शाजिया करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. शाजियाची नुकतीच टेस्ट केली असता त्यात ती पॉझिटिव्ह निघाली.

 मोरानी हे बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. शाहरुख खानसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. शाहरुखच्या अनेक सिनेमांचे ते निर्माते आहेत. 2015 मध्ये आलेल्या ‘दिलवाले’ सिनेमाची निर्मिती देखील त्यांची केली होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबॉलिवूडशाहरुख खान