Join us

सीएमच्या घराण्याला बॉलिवूडचा वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 16:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची वेळोवेळी चुणूक दाखवून दिली आहे. नुकताच त्यांनी महानायक ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची वेळोवेळी चुणूक दाखवून दिली आहे. नुकताच त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘फिर से’ नावाचा म्युझिक व्हिडीओ शुट केला आहे. शुटिंगदरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले असून, त्यातील अमृता यांचा अंदाज वाखण्याजोगा आहे. रेड ड्रेस आणि हाय हिल्समधील अमृता यांचा ग्लॅमरस लुक जबरदस्त असून, या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून त्या चाहत्यांना सुरांसोबत अभिनयाची जादूही दाखविणार आहेत. यापूर्वीदेखील अमृता या गाण्याच्या माध्यमातून कॅमेºयासमोर झळकल्या आहेत. प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले होते, आता त्या अभिनयातही नशीब आजमावणार असल्याने चाहत्यांना ही एक पर्वणी ठरेल यात दुमत नाही.दरम्यान, सीएमच्या घराण्यातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया अमृता या एकमेव नाहीत, तर यापूर्वीदेखील काही कलाकारांनी राजकारणाचा वारसा असतानाही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. अर्थात यातील काही हीट झालेत तर काही फ्लॉप...रितेश देशमुखमहाराष्टच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख याने राजकारणाचा प्रगल्भ वारसा लाभलेला असतानाही बॉलिवूडकडे झेप घेतली. रोमॅण्टिक, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन अशा सर्वच पातळ्यांवर रितेशने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. मुळात विलासराव देशमुख जरी राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्त्व समजले जात असले तरी त्यांना चित्रपटांप्रती प्रचंड आकर्षण होते. बॉलिवूड तथा मराठी सिनेमासंबंधित समारंभामध्ये ते आवर्जुन हजेरी लावत असत. त्यामुळेच रितेशच्या बॉलिवूड एंट्रीबाबत ते स्वत: उत्सुक होते. सध्या बॉलिवूडमध्ये रितेशने आपल्या वर्सटाइल अ‍ॅक्टिंगच्या जोरावर यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळविले आहे. त्याची पत्नी जिनेलिया डिसूझादेखील बॉलिवूड अभिनेत्री आहे. अरुणोदय सिंगमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचा नातू आणि अजय सिंग यांचा मुलगा अरुणोदय सिंग यानेदेखील राजकारणाची वाट न धरता बॉलिवूडमधील करिअर निवडले आहे. अरुणोदय गेल्या सात वर्षांपासून बॉलिवूडमध्ये झळकत आहे. मात्र मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये लीडिंग रोल मिळाला नसल्याने त्याचे स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मोहनजोदारो’ या चित्रपटात तो साइड रोलमध्ये बघावयास मिळाला. अरुणोदय बºयाच चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत बघावयास मिळाला. उदयनिधीतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी यानेदेखील राजकारणाच्या नव्हे तर इंडस्ट्रीच्या ट्रॅकवर पाऊल ठेवले. साउथ इंडस्ट्रीमध्ये उदयनिधी अभिनेता तथा दिग्दर्शकाच्या भूमिकेत बघावयास मिळाला आहे. आतापर्यंत त्याने ज्या-ज्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे, त्यासर्व चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत अपेक्षित असे यश मिळाले नाही. चिराग पासवान१९९६ पासून केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदावर असलेले रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनीदेखील बॉलिवूडप्रती प्रचंड आकर्षण आहे. कंगना स्टारर ‘मिले न मिले हम’ या चित्रपटात चिराग यांनी अभिनयाची जादू दाखविली होती. मात्र हा चित्रपट फारसा प्रभाव टाकू शकला नाही. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी इंडस्ट्रीच्या ट्रॅकवरून राजकारणाच्या ट्रॅकवर उडी घेतली. सध्या ते खासदार आहेत. अजितमाजी केंद्रीय सुरक्षामंत्री एके एंटनी यांचा मुलगा अजित यांनीदेखील ‘ओबेरॉय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ते राजकारण आणि बॉलिवूडमधूनही गायब झाले. अजित एंटनी हे सर्वांत लहान मुलगा असून, त्यांनी दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेज येथून शिक्षण पूर्ण केले आहे. नेहा शर्मा बिहारच्या भागलपूर येथील आमदार अजित शर्मा यांची मुलगी नेहा शर्मा हीदेखील बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी धडपड करीत आहे. अजित शर्मा यांनी दोन वेळा लोकसभा आणि तीन वेळा विधानसभा लढली आहे. नेहा ‘यंगिस्तान’ या चित्रपटातून बघावयास मिळाली होती. मात्र हा चित्रपट फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. नेहा २००७ पासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ‘तुम बिन - २’ मध्येही ती बघावयास मिळाली होती.