Join us

Kartik Aaryan : "सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही"; कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 16:55 IST

Bollywood Kartik Aaryan tests positive for corona : कार्तिकला याआधी देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

नवी दिल्ली - अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) व कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने सगळ्यांनाच थक्क केलं आहे. दहाच दिवसांत या सिनेमानं 100 कोटींचा आकडा पार केला होता. चालू आठवड्यातही सिनेमानं चांगली कमाई केली आहे. याच दरम्यान आता कार्तिकला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून त्याने याबाबत माहिती दिली आहे. 

कार्तिकला याआधी देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कार्तिकने आपल्या हटके अंदाजात याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. "सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही" असं म्हटलं आहे. तो कोविड पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीने चाहते निराश झाले आहेत चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. 

कार्तिक दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह 

बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिक आर्यनला याआधीही कोरोनाचा फटका बसला आहे. 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, काही दिवसांनंतर अभिनेता या गंभीर व्हायरसमधून बरा झाला होता. अशा परिस्थितीत आता परत कार्तिक आर्यन लवकरच कोरोनाची लढाई जिंकून पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हाऊसफुल 5 मध्येही झळकणार कार्तिक?

‘भुल भुलैय्या 2’मधील कार्तिकचा जबरदस्त अभिनय पाहून सगळेच त्याच्यावर फिदा आहेत. निर्माता-दिग्दर्शकही त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहेत. ‘भुल भुलैय्या 2’नंतर कार्तिक आर्यन ‘हाऊसफुल 5’मध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. शिवाय ‘भुल भुलैय्या 2’नंतर कार्तिकने त्याची फी डबल केल्याचंही म्हटलं जातंय. अर्थात या सगळ्या अफवा असल्याचं कार्तिकने स्पष्ट केलं आहे. ‘माझा पुढचा सिनेमा कोणता आहे, कोणी मला विचारेल का... बेसलेस,’असं त्याने म्हटले आहे. फी वाढवण्याबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. मी फी वाढवलेली नाही. लाईफमध्ये फक्त प्रमोशन झालंय, इंन्क्रीमेंट नाही, असं त्याने म्हटलं आहे.

 

टॅग्स :कार्तिक आर्यनकोरोना वायरस बातम्याबॉलिवूड