Join us  

लडकियां खिलौना है क्या... ? कंगनाची बहीण रंगोली बरसली कियारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 2:57 PM

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतची बहिण रंगोलीने अभिनेत्री कियारा आडवाणीवर निशाना साधला आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतची बहिण रंगोली निर्माता-दिग्दर्शक करण जोहरहृतिक रोशन यांच्यावर नेहमी टीका करताना पहायला मिळते. मात्र नुकतेच तिने अभिनेत्री कियारा आडवाणीवर निशाना साधला आहे. तिने तिच्यावर हैराण करणारे वक्तव्य केले आहे. सर्वांनाच माहित आहे की कियारा इंदू की जवानी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र रंगोली हिने चित्रपटाचे शीर्षकवर आक्षेप घेत ट्विट केले.

रंगोली चंडेल हिने ट्विटमध्ये लिहिले की, असे चित्रपट बनवण्यामागे काय हेतू असेल मुली खेळण्या आहेत का?

पुढे रंगोली म्हणाली की,एकीकडे महिला सक्षमीकरणावर बोलले जाते तर दुसरीकडे महिलांना समाजासमोर खेळण्यांसारखे सादर केले जातात. 

 

'इंदु की जवानी' चित्रपटाची कथा इंदु गुप्तावर आधारीत असून ती डेटिंग अॅपवर लेफ्ट व राइट स्वाईप करते आणि त्यामुळे ती एका अडचणीत सापडते, यावर आधारीत आहे. या चित्रपटातून बंगाली लेखक व फिल्ममेकर आबिर सेनगुप्ता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा सिनेमा सप्टेंबरमध्ये फ्लोअरवर जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल आडवाणी, निरंजन अयंगर व रायन स्टीफेन करत आहेत.

कियाराचा हा पहिला चित्रपट आहे जो महिला केंद्रीत आहे. याबाबत कियारा सांगते की,' इंदु तेजस्वी, प्रेमळ व विचित्र आहे. माझ्यासाठी हे सगळे नवीन आहे. यासाठी मी वर्कशॉप अटेंड करणार आहे. मी या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी खूप उत्सुक आहे.'

कियारा पुढे म्हणाली की,'या चित्रपटाची कथा आजच्या काळावर आधारीत आहे. माझे पात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. '

 याआधी कियारा कबीस सिंग चित्रपटात शाहिद कपूरसोबत झळकणार आहे. हा तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीरांगोळीकंगना राणौतकरण जोहरहृतिक रोशन