Join us  

अमिताभ यांच्या अगोदर ‘या’ स्टार्सचेही सोशल अकाउंट झाले आहे हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:19 PM

अलीकडे बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. काही तासानंतर त्यांचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले. मात्र सेलेब्सचे अकाउंट हॅक होणे हे पहिल्यांदाच घडले नाही. या अगोदरही काही दिग्गज सेलेब्सचे सोशल अकाउंट हॅक झालेले आहेत. आज आपण त्या सेलेब्सविषयी जाणून घेऊया...

-रवींद्र मोरे 

अलीकडे बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. काही तासानंतर त्यांचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले. मात्र सेलेब्सचे अकाउंट हॅक होणे हे पहिल्यांदाच घडले नाही. या अगोदरही काही दिग्गज सेलेब्सचे सोशल अकाउंट हॅक झालेले आहेत. आज आपण त्या सेलेब्सविषयी जाणून घेऊया...* अनुपम खेर

२०१८ मध्ये अनुपम खेर यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते. अनुपम खेर यांनी मीडियाला सांगितले होते की, जेव्हा ते अमेरिकेला होते तेव्हा भारतातील त्यांच्या मित्रांनी त्यांचे अकाउंट हॅक होण्यासंदर्भात सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार टर्किश सायबर आर्मी या हॅकिंगच्या मागे होते. हे अकाउंट हॅक झाल्यानंतर अकाउंटद्वारा आय लव्ह पाकिस्तान लिहण्यात आले होते.* अभिषेक बच्चन

अमिताभ बच्चन यांच्या अगोदर ज्यूनियर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन याचेही अकाउंट हॅक झाले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये अभिषेक बच्चनचे अकाउंट हॅक झाले होते आणि एकापाठोपाठ बरेच ट्वीट्स करण्यात आले होते. हॅकिंगनंतर अभिषेकच्या अकाउंटमधून व्हेरिफाइड बॅजदेखील डिलेट झाले होते. तसे लवकरच त्याचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले होते.* उर्वशी रौतेलाअभिनेत्री उर्वशी रौतेलाचेही सोशल अकाउंट हॅक झाले आहे. सांगू इच्छितो की, उर्वशीचे अकाउंट हॅक करुन त्याद्वारे आपत्तिजनक ट्वीट करण्यात आले होते, त्यानंतर उर्वशीने याबाबत सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.* ऋषि कपूरसोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहणारे ऋषि कपूर यांचेही ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. याबाबत ऋषि कपूर यांना तेव्हा समजले जेव्हा त्यांना चित्रविचित्र मॅसेज येणे सुरू झाले होते. नंतर त्यांनी तक्रार केली आणि त्यांचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले होते. सध्या आजाराच्या कारणाने ऋषि कपूर न्यूयॉर्क मध्ये उपचार घेत आहेत.* पूनम पांडेनेहमी आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणारी पूनम पांडेचेदेखील सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार पूनमचे सोशल मीडिया अकाउंट पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केले होते. हॅकिंगनंतर तिच्या अकाउंटद्वारा पोस्ट करण्यात आली होती की, पूनमला पाकिस्तानावर प्रेम आहे.* शाहिद कपूर

शाहिद कपूरचेही ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याच्या अकाउंटद्वारा लिहण्यात आले होते की, आय लव कॅटरिना कैफ. यानंतर मात्र लगेचच त्याचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले होते.

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनअनुपम खेरशाहिद कपूरअभिषेक बच्चनऋषी कपूर