Join us

‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप मध्ये राहिलेले बॉलिवूड सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 18:57 IST

अबोली कुलकर्णी ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप हा विषय बॉलिवूडमध्ये कॉमन झालाय. ‘लिव्ह इन’ रिलेशनशिप म्हणजे भारतीय संस्कृतीला डावलून स्वैराचार अंगिकारण्याप्रमाणे आहे, ...

अबोली कुलकर्णी ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप हा विषय बॉलिवूडमध्ये कॉमन झालाय. ‘लिव्ह इन’ रिलेशनशिप म्हणजे भारतीय संस्कृतीला डावलून स्वैराचार अंगिकारण्याप्रमाणे आहे, असे अनेक संघटनांचे म्हणणे असते. मात्र, तरीही या सर्व समजुती आणि परंपरांना नाकारून बॉलिवूडचे अनेक कपल ‘लिव्ह-इन’ मध्ये राहिले आहेत. ‘लिव्ह-इन’ मुळे अनेक चांगली जोडपी एकत्र आली तर अनेक दुरावली. पाहूयात, मग या ‘लिव्ह-इन’ मुळे कोणकोणती नाती अजूनही घट्ट आहेत आणि कोणती एकमेकांपासून दूर गेली.* सैफ अली खान आणि करिना कपूर ‘द रॉयल कपल’ सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे जोडपं ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपमुळेच एकत्र आले पुढे ते एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले. करिना ही नेहमीच सैफ अली खानसोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल गंभीर होती. लग्नाच्याअगोदर करिनाला ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपचा अनुभव घ्यायचा होता. तिने सर्व कपल्सला हेच सांगितले की, ‘मॉडर्न कपल्सनी या रिलेशनशिपचा अनुभव नक्की घ्यावा.’ * रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या फॅन्सला ते एकत्र आहेत की नाहीत याची सतत उत्सुकता लागलेली असते. ते एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात की वेगवेगळ्या? हा एक प्रश्न नेहमी फॅन्सच्या मनात असतो. या दोघांनीही लिव्ह इनचा अनुभव घेतला आहे. सध्या ते एकमेकांमुळेच चर्चेत आहेत. * विराट कोहली आणि अनुष्का शर्मा‘बॉलिवूडचं हॉट कपल’ विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांचं नातं मीडियासमोर मान्य केलं आहे. एवढंच काय पण, एका मॅचदरम्यान विराटने अनुष्काला फ्लार्इंग किस दिला. तेव्हाच मीडियाचे कॅमेरे चमकले. त्यांनी मीडियासमोर स्पष्ट केले होते की, ते त्यांचं नातं लपवणार नसून सर्वांसमोर ते जाहीर करणार आहेत. *  सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेएका टीव्ही मालिकेच्या सेटवर सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे हे कलाकार एकमेकांच्या पे्रमात पडले. तेव्हापासून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. त्यांनी एकत्र लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. नशीबाने त्यांचे आईवडीलही त्यांच्या या निर्णयात त्यांच्यासोबत होते. मात्र, काही वर्षांच्या लिव्ह इन नंतर आता ते एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.* आमिर खान आणि किरण रावबॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी केवळ एक अनुभव म्हणून ‘लिव्ह-इन’ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. लिव्ह इन मध्ये त्या दोघांचीही मनं जुळली आणि त्यांनी एकत्र राहण्याचे ठरवले. * कुणाल खेमू आणि सोहा अली खानबहीण भावाच्याच पाऊलावर पाऊल ठेवते, यानुसार सैफ अली खान ज्याप्रमाणे करिनासोबत लिव्ह इन मध्ये राहिला होता. तशीच सोहा अली खान हिने देखील तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड कुणाल खेमूसोबत लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. एकत्र राहिल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.