टेलिव्हिजन ब्युटी मौनी रॉयची लवकरच बॉलिवूड एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 16:23 IST
टेलिव्हिजन ब्युटी अर्थात मौनी रॉय बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. होय, बीजॉय नांबियारच्या चित्रपटातून मौनी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. नांबियार ...
टेलिव्हिजन ब्युटी मौनी रॉयची लवकरच बॉलिवूड एन्ट्री
टेलिव्हिजन ब्युटी अर्थात मौनी रॉय बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. होय, बीजॉय नांबियारच्या चित्रपटातून मौनी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. नांबियार यांचा अलीकडचा चित्रपट म्हणजे ‘वजीर’. यात अमिताभ बच्चन, फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरी अशी स्टारकास्ट होती. नांबियार आता नवा सिनेमा घेऊन येत आहे. हा नवा सिनेमा म्हणजे मणी रत्नम यांचा तामिळ ब्लॉकबस्टर ‘अग्नी नचथीरम’. १९८८मध्ये आलेला हा अॅक्शन थ्रीलर सिनेमा दोन सावत्र भावांच्या नात्यावर आधारित आहे. एका वृत्तानुसार, नांबियार यांनी या चित्रपटासाठी मौनीला पसंती दिली आहे. याशिवाय सुपर टेलेन्टेड विकी कौशल आणि ‘सनम तेरी कसम’ फेम हर्षवर्धन राणे या दोघांची नावे यासाठी निश्चित झाली आहे. मौनी रॉय यापैकी एकाची हिरोईन असेल. आहे ना मौनीची मज्जा!!