Yami Gautam: बॉलिवूडची 'फेअर अँड लव्हली' गर्ल म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे तिने हिंदी सिनेसृष्टीत स्वत ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'उरी',' काबिल', 'सनम रे' तसेचं 'बाला' आणि 'आर्टिकल ३७०' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ती अगदी अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाली. लवकरच यामी गौतम 'हक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड खुश असल्याचं चित्र आहे.मात्र, तुम्हाला माहितीये का आपल्या सौंदर्यांमुळे चर्चेत असणारी ही नायिका एका आजाराचा सामना करते आहे.
सुंदर आणि फेअर स्किनसाठी ओळखली जाणारी यामी गौतम एका त्वचेच्या आजाराने त्रस्त आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दल खुलासा केला होता. यामी गौतमला लहानपणापासून त्वचेचा एक आजार आहे.पण मागील काही वर्षांपासून या आजाराने पुन्हा डोकं वर काढलं. स्वत यामीने सोश मीडियावर देखील याबाबत पोस्ट शेअर करत आजारपणाबद्दल खुलासा केला होता.
यामी गौतम या आजाराने त्रस्त...
यामी गौतमचा हा आजार त्वचेशी निगडित असून त्याचं नाव केराटोसिस पिलेरिस (Keratosis Pilaris) असं आहे. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेवर काही डाग पडतात. या आजारावर अद्याप कोणते ठोस उपचार नसले तरीही मी डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे तिने सांगितलं होतं.