Join us

विराट कोहलीवर लट्टू झाली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, डेटवर जाण्यासाठी सुद्धा झाली होती तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 13:52 IST

विराट कोहलीचे जगभरात खूप चाहते आहेत. मात्र बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला त्याच्यासोबत डेटवर जायचे होते.

क्रिकेट आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे. काही क्रिकेटर्सचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत असलेल्या रिलेशनशीपची चर्चा बऱ्याचदा ऐकायलादेखील मिळते. त्यातील काहींनी लग्नदेखील केले. यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा समावेश आहे. अनुष्कासोबतच विराटच्या चाहत्यांंची संख्या कमी नाही.

विराट कोहलीचे जगभरात खूप चाहते आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीदेखील त्याची खूप मोठी चाहती आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत दिशाने या गोष्टीची खुलासा केला होता की विराट तिचा फेव्हरिट क्रिकेटर आहे आणि तिला त्याच्यासोबत डेटवर जायचे होते. 

विराट कोहली जेवढा त्याच्या खेळामुळे लोकप्रिय आहे तितकाच तो त्याचे लूक आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. कोहली खूप हॅण्डसम आहे आणि तरूणींमध्ये त्याचे खूप क्रेझ आहे. विराट जगातील एकमेक क्रिकेटर आहे ज्याचे सोशल मीडियावर १०० मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. 

दिशा पटानीला चित्रपटाशिवाय क्रिकेटमध्येही इंटरेस्ट आहे. विशेष बाब म्हणजे तिने २०१६ साली एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरीमध्येदेखील काम केले आहे. यातील तिच्या कामाचे खूप कौतुकही झाले. या चित्रपटात दिशासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. 

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती सलमान खानसोबत राधेमध्ये झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 

टॅग्स :दिशा पाटनीविराट कोहलीसुशांत सिंग रजपूत