Join us  

आधी फोन नंबर आणि आता डुप्लिकेट इन्स्टाग्राम अकाऊंट! विद्या बालन चिंतेत, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 4:37 PM

अभिनेत्री विद्या बालन फोन नंबर नंतर फेक इंस्टाग्राम अकाउंटची शिकार झाली आहे.

Vidya Balan : आपल्या अष्टपैलू अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालन ओळखली जाते. विद्या बालनने आतापर्यंत अगणित चित्रपटांमध्ये काम करत मनोरंजन विश्वात स्वत: ची वेगळी छबी उमटवली आहे. सध्या अभिनेत्री विद्या बालन ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 

भूलभूलैया, द दर्टी पिक्चर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने काम केलंय. विद्याने २००५ मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदापर्ण करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली. विद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यावर विद्याने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांना महत्त्वाची अपडेट दिली. 

अभिनेत्री विद्या बालनच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट चालवलं जात आहे. याची माहिती खुद्द विद्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. या संदर्भात अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संबंधित फेक अकाउंटवर रिपोर्ट केला आहे. 

अनेकदा काही चाहते आपल्या लाडक्या कलाकारांच्या नावाने फॅन्स अकाउंट चालवतात. पण या उलट एक चाहता चक्क विद्या बालनच्या नावाचा गैरवापर करत इंस्टाग्रामवर अकाउंट चालवत आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये विद्या म्हणते... सर्वांना माझा नमस्कार, आधी फोन नंबर आणि आता माझ्या नावाचा वापर करत  कोणीतरी फेक अकाउंट चालवत आहे.या अकाउंटद्वारे तो माझ्या नावाचा गैरवापर करुन लोकांसोबत संपर्क साधतोय. 

माझ्या टीमने या फेक अकाउंट चालवणाऱ्या विरोधात रिपोर्ट केला आहे. आता तुम्हीही या फेक अकाउंट विरोधात तक्रार करा आणि हे अकाउंट ब्लॉक करुन टाका. अशी पोस्ट विद्या बालनने केली आहे.

टॅग्स :विद्या बालनसोशल मीडियाइन्स्टाग्राम