Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सच्या विचित्र पाठलागामुळे त्रस्त झाल्या बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 19:11 IST

अबोली कुलकर्णीबॉलिवूड दुनियेचा झगमगाट , स्टारडम, शानशौक आपल्याला दिसतो. मात्र, येथे वावरणाऱ्या  कलाकारांनाही कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना ...

अबोली कुलकर्णीबॉलिवूड दुनियेचा झगमगाट , स्टारडम, शानशौक आपल्याला दिसतो. मात्र, येथे वावरणाऱ्या  कलाकारांनाही कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना नेहमीच करावा लागतो, हे आपल्याला दिसत नाही. कधी टीका-टिपण्णी, तर कधी आरोप-प्रत्यारोपही सहन करावे लागतात. खरंतर असे म्हणता येईल की, या ग्लॅमरच्या दुनियेची अशीही डार्क बाजू असू शकते हे कदाचित आपल्याला लक्षात देखील येणार नाही. आता हेच पाहा ना, अशातच नेहा धुपिया, इलियाना डिक्रुझ या अभिनेत्री फॅन्सच्या विचित्र फोन कॉल्स, धमकीचे फोन्स यांनी भयभीत झाल्या. आत्तापर्यंत अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांना असे विचित्र फॅन्स भेटले. पाहूयात, कोणकोणत्या आहेत या अभिनेत्री ? आणि त्यांच्या आपबितीचा हा वृत्तांत...सुष्मिता सेनबॉलिवूडचा एक काळ गाजवलेली अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. २००८ मध्ये तिला तिच्या एका फॅनने अक्षरश: मेटाकुटीला आणले. सुरूवातीला तो निनावी गिफ्टस पाठवत असायचा. त्यानंतर त्याचे गिफ्टस दर दोन दिवसाला येऊ लागले. एके दिवशी तर चक्क नववधूचा ड्रेस आणि लग्नासाठीचे साहित्य देखील तिला गिफ्ट म्हणून आले. त्यानंतर विचित्र मेसेजेस आणि पत्रं यांनी तिला त्रास देऊ लागला. त्यानंतर कंटाळून तिने नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.प्रियांका चोप्राबॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल पर्सनॅलिटी बनली आहे. ती अशातच बार्सेलोना येथे चित्रपटाच्या शूटींगसाठी गेली होती. तेव्हा तिच्या मुंबईतील घराच्या भोवती एक तिचा फॅन फिरत होता. त्याने एका बॅगमध्ये तिला देण्यासाठी मिठाई, बांगडया आणि फुलं आणली होती. असे वाटत होते की, तो तिला भेटू इच्छित होता. मात्र, त्याचा संशय येऊन तेथील सेक्युरिटी गार्डने पोलिसांत तक्रार नोंदवली. कॅटरिना कैफ बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ ही देखील २००९ मध्ये एका वेड्या फॅनमुळे अडचणीत आली होती. तो तिला प्रत्येक ठिकाणी फॉलो करत असायचा. तसेच तिच्या अपार्टमेंटलाही तो फेऱ्या  मारायचा. तो मुंबईतील एका प्रमोशनल इव्हेंटला देखील तिचा पाठलाग करत करत पोहोचला. मात्र, तिथे तिच्या सेक्युरिटी गार्ड्सनी तिला पोहोचूच दिले नाही. दिया मिर्झाबॉलिवूडमधील बोटांवर मोजता येणाऱ्या  क्यूट अभिनेत्रींमध्ये दिया मिर्झाचे नाव समाविष्ट करण्यात येते. तिचे क्यूट स्माईल आणि स्टनिंग लूककडे पाहून कुणाला वाटेल का की, तिला एखाद्या फॅनमुळे त्रास झाला असेल? तर नाही. पण, तिने देखील एका ३० वर्षीय डॉक्टर फॅनच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्याने तिच्याकडे लग्न करण्यासाठी पिच्छा पुरवला होता. तिने त्याच्याविरूद्ध कुठली तक्रार केली नाही. कारण तो तिच्यापासून योग्य अंतर ठेवून होता. मात्र, जेव्हा त्याचा पाठलाग हिच्या सहनशक्तीपलीकडे गेला तेव्हा तिने २००९ मध्ये तक्रार नोंदवली.कंगना राणौत‘द क्वीन’ कंगना राणौत म्हटल्यावर फॅन फॉलोर्इंग असणारच. मात्र, ती एका फॅनच्या पाठलागामुळे भयंकर परेशान झाली होती. २०१० मध्ये एक फॅन जीममध्ये तिचा पाठलाग करत असायचा. तसेच तो तिच्या घरी जाऊन गिफ्टस आणि लव्हलेटर्स द्यायचा. तिला लव्हलेटर्स मेल देखील करायचा. अखेर त्याच्या सततच्या पाठलाग करण्याने त्रस्त होऊन तिने पोलिसांना बोलावले. अन् त्याची चांगलीच खबर घेतली.