क्रिकेट आणि बॉलिवूडचं कनेक्शन काही नवं नाही. अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्या अफेरच्या चर्चा या होत असतात. क्रिकेटर मोहम्मद सिराजने अभिनेत्री माहिरा शर्माचे फोटो लाइक केल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेटर शुबमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीने शुबमनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शुबमन गिल त्याच्या लव्ह लाइफमुळे कायमच चर्चेत असतो. याआधी त्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं गेलं होतं. तर आता एका अभिनेत्रीनेच त्याला डेट करायचं असल्याचं उघडपणे सांगितलं आहे. खेल खेल में फेम अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालने शुबमन गिलला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिची ही इच्छा कॅमेऱ्यासमोरच बोलून दाखवली. या मुलाखतीत प्रज्ञाला एका चाहत्याची कमेंट वाचून दाखविण्यात आली.
"प्रज्ञा आणि शुबमन क्यूट कपल दिसतील", असं चाहत्याने म्हटलं होतं. हे ऐकताच प्रज्ञाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने शुबमनला डेट करण्याची इच्छा सांगितली. ती म्हणाली, "हो तो खरंच खूप क्यूट आहे. चला तर मग जे तुम्हा सगळ्यांना हवंय...जोडी बनवा यार. मला क्रिकेटर्सशी काहीच प्रॉब्लेम नाही". त्यानंतर तिला शुबमनला डेट करशील का? असं विचारण्यात आली. यावर प्रज्ञा म्हणाली, "जर नशिबात हेच लिहिलं असेल तर का नाही...असं होऊही शकतं. चांगली व्यक्ती असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही".
साराबरोबरच शुबमन गिलचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि शुबमन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, नंतर ते दोघे डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं होतं. तर सारा तेंडुलकर आणि शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.