Join us

"तर मी स्वतःला...", आई श्वेता तिवारीशी होणाऱ्या तुलनेवर पलकने तिवारीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:58 IST

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते.

Palak Tiwari: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते. आपल्या आईच्या पावलावर पाऊस ठेवत पलकने अभिनयाची वाट धरली आहे. सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून पलकने इंडस्ट्रीत डेब्यू केला. सध्या पलक तिवारी भूतनी या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. पंरतु, अनेकदा पलक तिवारीची तिच्या आईसोबत तुलना केली जाते. यावर एका मुलाखतीमध्ये पहिल्यांदा अभिनेत्रीने स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. 

नुकतीच पलक तिवारीने 'आयएएनएस' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिची आई श्वेता तिवारीसोबत होणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं. "माझ्या आईची इतक्या वर्षांची कारकीर्द आणि यश पाहता माझी तिच्याशी तुलना करणं योग्य नाही. खरं सांगायचं झालं तर , त्यामुळे मला काही फरक पडत नाही. जर काही असेल तर  माझी आईने यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. तिने जे काही यश मिळवलं आहे, त्याची तुलना माझ्यासोबत करणं योग्य नाही."

त्यानंतर पुढे पलक म्हणाली, "मी प्रत्यक्षात खूप आनंदी आहे. मला वाटत नाही की मी तिच्यासारखी दिसते, पण मी एक दिवस तिच्यासारखी होण्याचे स्वप्न पाहते. जर मी तिच्याप्रमाणे थोडी जरी लोकांशी जोडली जाऊ शकले तर मी स्वतःला यशस्वी समजेन." असं म्हणत पलक तिवारीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पलक तिवारी लवकरच 'रोमियो एस-३' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती 'रोमियो एस-३' मध्ये पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यामध्ये ती ठाकूर अनुप सिंगसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :श्वेता तिवारीपलक तिवारीबॉलिवूड