Join us  

Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 4:01 PM

या फोटोत करीना बीचवर बिकिनीत मस्ती करताना दिसत आहे. तिने व्हाइट बिकिनीवर आपला फोटो शेअर केला आहे.

 मुंबई - जागतिक योग दिवसानिमित्त बरेच लोक आपले योगा करतानाचे फोटो शेअर करताना आणि योगामुळे होणाऱ्या फायद्यांवर चर्चा करताना दिसत आहेत. अशातच बॉलीवुड अभिनेत्री करीना खाननेही योगा करतानाचा आपला एक जुना फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिचा हा फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायर होत आहे. पतौडी बेगमच्या या खास अंदाजाला चाहतेही मोठ्या प्रमाणावर लाईक करत आहेत. (International Yoga Day 2021)

या फोटोत करीना बीचवर बिकिनीत मस्ती करताना दिसत आहे. तिने व्हाइट बिकिनीवर आपला फोटो शेअर केला आहे. यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना एक सुंदर संदेश दिला आहे. फोटोला कॅप्शन देत करीना लिहिते, "जागतिक योग दिवसाच्या शुभेच्छा. आपले मन मोकळे करा.'' बेबोच्या या संदेशाबरोबरच फोटोतील तिचा बोल्ड लुकदेखील चर्चेचा विषय ठरला आहे. 

फिटनेस फ्रिक अमृता खानविलकरच्या भन्नाट योगा पोज

करीना खान ही बी टाऊनच्या फिटनेस फ्रिक हिरोइन्सपैकी एक आहे. करीना रोज योगा क्लास आणि जीम बाहेर दिसून येते. याच बरोबर सोशल मिडियावर करीना कपूरचे बरेच फोटो आणि व्हिडिओ आहेत. यात करीना जीम मारताना दिसत असते. करीना कपूर दोन मुलांची आई आहे. मात्र, तिचा फिटनेस पाहून चाहतेही अवाक होतात. याच बरोबर करीना एक फिटनेस आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे.

करीनाने 21 फेब्रुवारीला आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करीना आणि सैफने 16 ऑक्टोबर, 2012 रोजी लग्न केले आहे. आणि 20 डिसेंबर, 2016 रोजी त्यांचा पहिला मुलगा तैमूरचा जन्म झाला होता.

चक्क मुंबईच्या रस्त्यावर बयेचा हॉट योगा; मराठमोळ्या कृतिका गायकवाडनं शेअर केले फोटो

वर्क फ्रंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, करीना लवकरच आमिर खान सोबत 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसेल. मात्र, इतर चित्रपटांप्रमाणेच तिच्या चित्रपटाच्या शूटिंगवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. तिचा हा चित्रपट याच वर्षी ख्रिसमसच्या मुहुर्तावर म्हणजेच 25 डिसेंबर 2021 रोजी रिलीझ होऊ शकतो. या चित्रपटाचे डायरेक्टर अद्वैत चंदन हे आहेत. 

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडयोगासने प्रकार व फायदेआंतरराष्ट्रीय योग दिन