Join us

"लोक काहीही बोलायचे, कमेंट्स करायचे…",लेकीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 10:23 IST

लेकीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलची प्रतिक्रिया,म्हणाली-"कोणतंही मूल..."

Kajol : कलाकारांच्या मुलांनी अभिनेता, अभिनेत्री होणं हे चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाही.अनेकदा बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सबद्दल चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतही अनेक स्टारकिड्स आहेत.यापैकी एक नाव निसा देवगण. अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणची लेक निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. अनेकदा निसा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील चर्चेत असते. काजोलच्या लेकीला बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.याबद्दल आता काजोलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री काजोल तिच्या चित्रपटांमुळेच नाहीतर बिनधास्त स्वाभावामुळे देखील चर्चेत असते. वेगवेगळ्या गोष्टींवर ती आपली प्रतिक्रिया देत असते.अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिची लेक निशाच्या होणार्‍या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. निसाला कायम तिच्या दिसण्यावरून बोललं गेलं,यावर तिने मत मांडलंय. काजोल 'टू मच विथ काजोल  अॅंड ट्विंकल' या शोमध्ये म्हणाली, "मला आठवतंय निसा लहान असताना तिच्याबद्दल खूप काही चुकीचं बोललं जायचं. तिचे बालपणीचे फोटो पाहून पापाराझी तसेच सोशल मीडियावर लोक काहीही बोलायचे, कमेंट्स करायचे."

मग पुढे तिने म्हटलं, "पण, मुलं ही मुलं असतात. प्रत्येक मुल क्युट असतं. कधी त्यांचा हेअरकट व्यवस्थित नसतो. कपडे फारसे फॅन्सी नसतात.ते अत्यंत साध्या कपड्यांमध्ये असतात. मला आठवतंय त्यामुळे तिला खूप वाईट वाटलेलं निसा प्रचंड तणावात असायची. इतकंच नाही माझा मुलगा युगनेही याचा सामना केला आहे." असा मोठा खुलासा अभिनेत्रीने केला. 

ट्विंकल खन्ना काय म्हणाली?

याच विषयावर आपलं मत मांडत होस्ट ट्विंकल खन्ना म्हणाली, "जर कोणीही विनाकारण माझ्या मुलांबद्दल बोलत असेल तर त्याचं मला फार वाईट वाटतं. कोणालाही या गोष्टीची पर्वा नसते की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात.पण, जेव्हा मुलांच्या बाबतीत असं काही घडलं तर त्याचं दुख होतं." असं मत ट्विंकलने मुलाखतीत व्यक्त केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kajol's strong response to trolls targeting daughter Nysa's appearance.

Web Summary : Kajol addressed the trolling her daughter Nysa faces regarding her appearance. She recounted Nysa's distress over unwarranted comments during her childhood, emphasizing that children should be allowed to be themselves. Twinkle Khanna echoed Kajol's sentiment, highlighting the pain of unwarranted criticism directed at children.
टॅग्स :काजोलबॉलिवूडसेलिब्रिटी