Join us  

दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:22 AM

Deepika padukone: दीपिकाला लागली मातृत्वाची चाहूल; रणवीर सिंगच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

बॉलिवूडमधील पॉवर कपल अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika Padukone) आणि रणवीर सिंग (ranveer singh) यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. दीप-वीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दीपिकाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ती आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. सोबतच त्यांचं बाळ कोणत्या महिन्यात जन्माला येणार आहे हे सुद्धा तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दीपिकाचं बाळ यावर्षी सप्टेंबर महिन्यात जन्माला येणार आहे. दीपिकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी दीपिका-रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपिकाची ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली असून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, दीपिका-रणवीरने 14 नोव्हेंबर 2018 लग्नगाठ बांधली. इटलीतील लेक कोमा येथे या दोघांनी कोकणी आणि सिंधी रितीरिवाजानुसार लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे या जोडीचं लग्न झाल्यापासून चाहते कायम त्यांना बेबी प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारायचे. अखेर दीपिकाने २०२४ मध्ये ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूडसेलिब्रिटी