Join us

फोटोतील 'या' क्यूट अभिनेत्रीला ओळखलं का? लग्नात होती गरोदर, आज बॉलिवूडवर करतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 16:12 IST

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

बॉलिवूड सेलिब्रिटींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुकलीच्या क्युटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या आईसोबत दिसत आहे. नुकताच या अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच या अभिनेत्रीने आई होण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर खानदानातील सुपुत्राबरोबर लग्न करत संसार थाटला. घाईघाईतच बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडप्याने लग्न उरकलं होतं. लग्नाच्या काहीच महिन्यानंतर अभिनेत्रीने आई होणार असल्याची बातमी दिली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी या अभिनेत्रीने गोंडस लेकीला जन्म दिला. त्यामुळे ती लग्नातच गरोदर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आलिया भट्ट आहे. 

आलियाची आई सोनी राजदान यांचा आज वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त आलियाने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने आईबरोबरचा हा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. आलियाने शेअर केलेल्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, आलियाला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आलियाने एप्रिल २०२२मध्ये रणबीर कपूरशी लग्न करत संसार थाटला. नोव्हेंबर महिन्यात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी लेकीचं नाव राहा असं ठेवलं आहे. 

टॅग्स :आलिया भटसेलिब्रिटी