lulia vantur :बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. करिअरमध्ये सलमानचं नाव अनेक मॉडेल तसेच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यातील एक नाव म्हणजे यूलिया वंतूर. मात्र, अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुळची रोमानियाची असलेल्या यूलिया वंतुरबद्दल आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी यूलिया अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं सांगण्यात येत आहे. गायन क्षेत्रात नशीब अजमावल्यानंतर यूलिया अभिनय करताना दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यूलिया वंतूर बॉलिवूड अभिनेत्यासोबत तिच्या डेब्यू फिल्ममध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. युलिया वंतूर तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहे. पण, ती बॉलिवूड चित्रपटातून नाही तर एका इंग्रजी शॉर्ट फिल्ममधून. ५ मे २०२५ रोजी, युलिया वंतूरने चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांची पोस्ट सोशल मीडियावर रिशेअर करत चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट दिली होती. 'इकोज ऑफ अस' असं या चित्रपटाचं नाव आहे. दरम्यान, 'इकोज ऑफ अस' या शॉर्ट फिल्मध्ये युलिया वंतूर मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेते दीपक तिजोरी देखील चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
वर्कफ्रंट
यूलिया वंतूरने बॉलिवूड सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. 'जीनिअस', 'प्यार दे प्यार ले', 'राधे' मधलं 'सीटी मार' सारखी काही गाणी तिने गायली आहेत. यूलियाने सलमानच्या 'दबंग 3' मध्ये गाणं गायलं होतं. २०११ मध्ये 'एक था टायगर' सिनेमाच्या वेळी डब्लिनमध्ये तिची सलमानशी ओळख झाली होती. यूलिया सलमान खानसोबत बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.