Ranvir Shorey:बॉलिवूड इंडस्ट्रीत कलाकारांचे घटस्फोट, लग्न मोडणं या गोष्टी काही नवीन नाहीत. इंडस्ट्रीतील या कलाकारांची कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चा रंगलेली असते. कधी त्यांचे चित्रपट तर कधी त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट तक कधी वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चेचा विषय बनतात. असाच अलीकडेच बॉलिवूड अभिनेता रणवीर शोरेने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी हा त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला.रणवीर शौरीने अभिनेत्री कोंकणा शर्मासोबत २०१० मध्ये लग्न केलं होतं. पण १० वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले. या जोडप्याला १४ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. अलिकडेच रणवीर शौरीने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत डेटिंग अॅप्सचा वापर,घटस्फोट आणि मुलाचं संगोपन करण्याबद्दल उघडपणे सांगितलं. तो म्हणाला, 'तुम्ही एक्स पार्टनरसोबत इतके जास्त संपर्कात राहू नका तुमच्या सध्याच्या जोडीदाराला अस्वस्थ वाटेल.अर्थात, जर तुम्ही एखाद्याशी रिलेशनशिपमध्ये होतात आणि अचानक त्या व्यक्तीची आणि तुमची भेट झाली, तर तुम्ही त्याला साधा हॅलो सुद्धा बोलणार नाही असं नसतं. इतक्यात गोष्टी बदलत नसतात. पण मला वाटत की ते नातं इतकंही वाढवू नये की एक्स जोडीदार तरीही तुमच्या कुटुंबाचा भाग असेल."
त्यानंतर डेटिंग अॅप्सचा वापर करण्याच्या त्या चर्चांवर उत्तर देत रणवीर म्हणाला, "हो, मी डेटिंग ॲप्स वापरतो. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतातमाझ्यासाठी, घटस्फोटित पुरुष, एक वडील म्हणून, या गरजा ३० वर्षांच्या पुरूषापेक्षा वेगळ्या असतील."
घटस्फोटाबद्दल अभिनेता काय म्हणाला...
त्यानंतर अभिनेत्याने पत्नी कोंकणा सेन शर्मापासून वेगळे होण्याबद्दल आणि त्यांच्या मुलाच्या संगोपनाबद्दल सांगितलं की, "मला यासाठी योग्य वेळी वेगळं व्हायचं होतं.त्याआधीही मला काही समस्या होत्या. पण मी माझा मुलगा चार वर्षांचा होईपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे आणखी उशीर करायचा नव्हता. मला वाटत होतं की पुढे जाऊन या सगळ्याचा परिणाम त्याच्यावर होईल आणि हेच वय त्याच्यासाठी योग्य होतं. कारण,या वयात मुलांना समजतं की त्यांचे आई-वडील कोण आहेत.या काळात जर त्यांना नवीन गोष्टींशी जुळवून घ्यावे लागले तर मला वाटते की ते कमी वेदनादायक ठरेल."
कोंकणा शर्मा आणि रणवीर शौरी या दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ट्रॅफिक सिग्नल, मिक्स्ड डबल्स अशा चित्रपटांत दोघे एकत्र दिसले. एकत्र काम करतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि दोघांनी लग्न केले होते. लग्नाआधीच कोंकणा प्रेग्नेंट होती. यामुळे या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. 2016 मध्ये प्रदर्शित ‘डेथ इन अ गंज’ हा रणवीर व कोंकणाचा एकत्र असा शेवटचा सिनेमा होता.
Web Summary : Ranvir Shorey, divorced from Konkona Sen Sharma after 10 years, reveals he's using dating apps. He discussed co-parenting, emphasizing boundaries with ex-partners for current relationships.
Web Summary : रणवीर शौरी, कोंकणा सेन शर्मा से 10 साल बाद तलाक के बाद, डेटिंग ऐप का उपयोग कर रहे हैं। उन्होंने सह-पालन पर चर्चा की, और वर्तमान रिश्तों के लिए पूर्व भागीदारों के साथ सीमाओं पर जोर दिया।