Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी फ्लाइंग किस वाद: प्रकाश राज यांनी स्मृती इराणींनाच सुनावलं, म्हणाले, "मॅडमजी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:00 IST

राहुल गांधी फ्लाइंग किस वादावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया, स्मृती इराणींवर साधला निशाणा, म्हणाले...

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बुधवारी(९ ऑगस्ट) राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाषण संपल्यानंतर ते सभागृहातून निघून गेले. यानंतर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधींवर फ्लाइंग किसचा इशारा केल्याचा आरोप केला. संसदेतील स्मृती इराणी आणि राहुल गांधी वादाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या प्रकणावर भाष्य केलं आहे.

समाजातील अनेक घडामोडींवर व्यक्त होणाऱ्या प्रकाश राज यांनी संसदेतील स्मृती इराणी यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रकाश राज यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “मणिपूरमध्ये जे झालं त्यामुळे नाही तर फ्लाइंग किसमुळे मॅडमजी नाराज आहेत,” असं प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. प्रकाश राज यांच्या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटलं तर...”, हेमांगी कवीच्या पोस्टने वेधलं लक्ष

“नितीन गडकरींना टॅग करुनही...”, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या तक्रारीनंतर मराठी अभिनेत्री नाराज

स्मृती इराणी काय म्हणाल्या?

माझ्या आधी ज्यांना बोलायची संधी देण्यात आली त्यांनी आज असभ्यपणाचा परिचय दिला आहे. त्यांनी आपले भाषण संपल्यानंतर, असभ्य वर्तन केले. त्यांनी ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते. एवढेच नाही, तर असे असभ्य आचरण या देशाच्या संसदेत कधीही दिसले नाही. हे त्या खानदानाचे लक्षण आहे, हे आज देशाला समजले.

टॅग्स :स्मृती इराणीराहुल गांधीप्रकाश राज