Tanvi The Great Re-Release: प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अनुपम खेर यांना दिग्दर्शित आणि निर्मिती असलेला 'तन्वी द ग्रेट' हा बहुचर्चित चित्रपट २६ सप्टेंबर, २०२५ रोजी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा त्यांच्यासाठी अत्यंत खास होता. कुटुंबाच्या भावनिक क्षणांचा उलगडा करणारा करणारा हा चित्रपट हा प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा पाहता येणार आहे. कधी, कुठे याबद्दल जाणून घ्या सविस्तर...
पहिल्या प्रदर्शनाच्या वेळी, या चित्रपटाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रीय नेत्यांसाठी याचे खास स्क्रीनिंग आयोजित केले गेले होते. ९८व्या अकादमी पुरस्कारासाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी शीर्ष तीन दावेदार म्हणून गौरवल्या गेलेल्या 'तन्वी द ग्रेट'ने त्याच्या अनोख्या कथेमुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रचंड आदर मिळवला.
'तन्वी द ग्रेट' सिनेमाचं कथानक
या चित्रपटाद्वारे तन्वी रैना नावाच्या एका उत्साही, ऑटिस्टिक मुलीची प्रेरणादायी कहाणी मांडण्यात आली आहे.ज्या क्षणी तिला कळतं की तिच्या दिवंगत लष्करी वडिलांचे सियाचेन ग्लेशियरवर ध्वजाला सलाम करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या निश्चयाने ती एक रोमांचक मिशन सुरू करतं, ज्यात हास्य आणि निरागसतेचा यांचा मिलाफ आहे.त्यामुळे हा चित्रपट मुळे लहान मुले, पालक आणि आजी- आजोबा सर्वजण एकत्र बसून हा चित्रपट पाहू शकतात.
दरम्यान, या चित्रपटाबद्दल अनुपम खेर भावना व्यक्त करत म्हणाले, “हा चित्रपट फक्त देशभक्तीबद्दल नाही- तो प्रेम, कुटुंब आणि दुसऱ्या संधीबद्दल आहे. याला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो, पण मला विश्वास आहे की हे चित्रपटगृहांमध्ये कुटुंबांनी एकत्र अनुभवण्यासाठीच बनलेले आहे."
'तन्वी द ग्रेट'बद्दल ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी सांगितले, "काही कथा तुम्हाला एकाच वेळी हसवतात, रडवतात आणि स्वप्न पाहायला लावतात. 'तन्वी द ग्रेट' हा असाच एक दुर्मिळ चित्रपट आहे जो कुटुंबांना एकत्र आणतो."
बोमन इराणी काय म्हणाले?
बोमन इराणी यांनी विचार व्यक्त केला, "हा चित्रपट आपल्याला आठवण करून देतो की रोजचे नायक अनेकदा आपल्या घरातच असतात, जे शांतपणे प्रेमाने आपली ताकद सांभाळत असतात."
तन्वीची भूमिका साकारणाऱ्या नवोदित अभिनेत्री शुभांगी दत्त म्हणाली, "या चित्रपटामुळे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. प्रत्येक कुटुंबाच्या भावनांना स्पर्श करू शकणाऱ्या एका कथेचा भाग असल्याबद्दल मी आभारी आहे."
आपल्या दमदार कथेमुळे, भावपूर्ण अभिनयामुळे आणि प्रेरणादायी संदेशामुळे 'तन्वी द ग्रेट' हा केवळ एक चित्रपट नाही तो एक अविस्मरणीय कौटुंबिक सोहळा ठरणार आहे.हा चित्रपट २६ सप्टेंबर, २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे.