Join us  

ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय खन्ना; 'या' अभिनेत्यामुळे झाला दोघांचा ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 6:45 PM

Akshaye khanna: ऐश्वर्या आणि अक्षय या जोडीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्या काळी त्यांच्या नात्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षय खरोखर ऐश्वर्याच्या प्रेमात बुडाला होता.

कलाविश्वात बऱ्याचदा कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा रंगत असते. यात अनेक स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. यात काही जण यशस्वी झाले. तर, काही जण सपशेल अपयशी ठरले. परंतु, यात अपयशी ठरुन सुद्धा एक स्टार किड, अभिनेता सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना.करिअरच्या सुरुवातीच्या काळात अक्षयने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, त्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. मात्र, त्याच्या लव्हलाइफमुळे तो कायम चर्चेत राहिला. सध्या अक्षय त्याच्या अशाच एका  प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. एकेकाळी अक्षय, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनवर जीवापाड प्रेम करत असल्याचं सांगण्यात येतं.

ऐश्वर्याच्या प्रेमात बुडाला होता अक्षय

ऐश्वर्या आणि अक्षय या जोडीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्या काळी त्यांच्या नात्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षय खरोखर ऐश्वर्याच्या प्रेमात बुडाला होता. इतकंच नाही तर त्याने ऐश्वर्याला प्रपोजही केलं होतं. सुभाष घई यांच्या ताल सिनेमाच्या सेटवर या जोडीची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी 'आ अब लौट चले' या सिनेमात पुन्हा एकत्र काम केलं. याच काळात अक्षयने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं.

अक्षयच्या प्रपोजवर ऐश्वर्याची होती ही प्रतिक्रिया

'आ अब लौट चले' च्या सेटवर अक्षयने ऐश्वर्याला प्रपोज केलं.  मात्र, ऐश्वर्याने कोणतंही उत्तरं न देता फक्त हसली आणि तेथून निघून गेली. या घटनेनंतर दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. मात्र, सलमानच्या येण्यामुळे ऐश्वर्या आणि अक्षयच्या नात्यात दुरावा आला. 'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवर ऐश्वर्या, सलमानच्या प्रेमात पडली आणि तेव्हापासून तिने अक्षयपासून दूर रहायला सुरुवात केली.  

ऐश्वर्यानंतर आणखी दोन अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता अक्षय

ऐश्वर्या रायपासून दूर झाल्यानंतर अक्षय तारा शर्माच्या प्रेमात पडला. मात्र, त्यांचं हे नातं सुद्धा फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अक्षयने अभिनेत्री रिया सेनला प्रपोज केलं. मात्र, रियासोबतचं नातंही फार काळ टिकलं नाही. दरम्यान, अक्षय त्या काळातील लोकप्रिय अभिनेता होता. अक्षयने 'ताल,' 'हंगामा', 'नकाब', 'दिल चाहता है', 'इत्तेफाक', 'दृश्यम २' यांसारखे एकाहून एक सरस सिनेमे केले. 

टॅग्स :अक्षय खन्नाऐश्वर्या राय बच्चनसलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा