दबंगकडून गर्लफ्रेंडसाठी 'बॉडीगार्ड' !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:31 IST
दबंग सलमान खान आणि गर्लफ्रेंड ल्युलिया वॉच्युअरच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्या आहेत. सलमान जिथं जातो तिथं याबाबत ...
दबंगकडून गर्लफ्रेंडसाठी 'बॉडीगार्ड' !
दबंग सलमान खान आणि गर्लफ्रेंड ल्युलिया वॉच्युअरच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्या आहेत. सलमान जिथं जातो तिथं याबाबत प्रश्न विचारले जातायत. नुकतंच प्रिती झिंटाच्या रिसेप्शनला सलमान आणि ल्युलियानं एकत्र हजेरी लावली. त्यावेळी सलमानसह ल्युलियालाही माध्यमांनी लग्नाबाबत विचारलं. तिच्याभोवती गराडा निर्माण झाला. त्यामुळंच की काय रुपेरी पडद्यावरचा बॉडीगार्ड थोडा काळजीत पडला. ल्युलियासाठी या सलमाननं तीन तीन बॉडीगार्डची नियुक्ती केली. जिथं जिथं ल्युलिया जाईल तिथं तिथं हे बॉडीगार्ड तिच्या बाजूला तैनात असतील. कुणालाही ल्युलियाला भेटण्यासाठी या तीन बॉडीगार्डचं कडं भेदावं लागणार आहे. ल्युलियाबद्दल बॉडीगार्ड सलमान खान बराच प्रोटेक्टिव्ह असल्याचं यानिमित्तानं समोर आलंय.