Join us

ब्लॉकबस्टर ‘बाहुबली-२’मध्येही झाल्या चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 23:06 IST

भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर कोरणाºया ‘बाहुबली-२’ने दहा दिवसांतच एक हजार कोटी रुपयांचा गल्ला जमविला. मात्र इतर ...

भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर कोरणाºया ‘बाहुबली-२’ने दहा दिवसांतच एक हजार कोटी रुपयांचा गल्ला जमविला. मात्र इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटात दिग्दर्शकांकडून चुका केल्या गेल्या. सध्या या चुका वॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला आठ चुका दाखविणार आहोत, त्या बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जसे की, भल्लादेव याचा मुलगा भद्रा चित्रपटात दाखविला; परंतु त्याची आई कोण? हे मात्र अजूनही समजले नाही. अशाच काहीशा चुका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चूक १) वंश एक; मात्र निशाण वेगळे कसे?‘बाहुबली’मध्ये अमरेंद्र बाहुबली (प्रभास) आणि भल्लादेव (राणा दग्गुबात्ती) भाऊ दाखविण्यात आले असून, ते एकाच वंशाचे आहेत. मात्र अशातही बाहुबलीच्या कपाळावर चंद्र तर भल्लादेव याच्या कपाळावर सूर्य गोंदलेला असतो. हा फरक का? याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळाले नाही. चूक २) भद्राची आई कोण?बाहुबलीच्या पहिल्या भागात भद्राला भल्लादेव याचा मुलगा दाखविण्यात आले. दुसºया भागाच्या क्लायमॅक्समध्ये भल्लादेवच्या याच भद्रा नावाच्या मुलाचे शिर कापलेले दाखविण्यात आले आहे. मात्र दोन्ही भागात भद्राच्या आईचा किंवा भल्लादेवच्या पत्नीचे दर्शन घडले नाही. अशाच प्रेक्षकांसाठी हे कोडं निर्माण झालं आहे. चूक ३) ढाल कशी पकडली?ज्या ढालला पकडून बाहुबली (महेंद्र) आणि त्याचे सहकारी पकडून महालात उडतात, त्या ढालीला पकडण्यासाठी काहीच नसते. अशात ते कशाचा आधार घेऊन ढालीच्या साह्याने उडतात?चूक ४) वॉर करण्याअगोदरच जमीन क्रॅकया सीनमध्ये जेव्हा भल्लादेव बाहुबलीवर वार करत असतो, तेव्हा वॉर करण्याअगोदरच जमीन क्रॅक झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तर असे कसे घडले?चूक ५) रक्ताचे निशाणही गायबवरील हे दोन फोटो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, यामध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे. कारण एका अ‍ॅँगलच्या फोेटोमध्ये रक्त बाहुबलीच्या कपाळावरून येत आहे, तर दुसºया अ‍ॅँगलमधून घेतलेल्या याच फोटोमध्ये बाहुबलीच्या कपाळावरील हे रक्त दिसतच नाही. चूक ६) धनुष्यबाणात नेमके किती बाण?जेव्हा पिंडारी हल्ला करतात तेव्हा बाहुबली आणि देवसेना धनुष्यबाणाच्या मदतीने त्यांचा सामना करतात. बाहुबली तर त्याच्या धनुष्यबाणातून एका वेळेला तीन-तीन बाण सोडत असतो. मात्र अशातही त्याच्याकडील बाण संपत नाहीत. वास्तविक योद्ध्याकडे एका वेळेला किमान १२ ते १५ बाण असतात. चूक ७) अगोदर दिसली डेडबॉडी नंतर झाली गायब.जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारत असतो तेव्हा त्याठिकाणी एक मोठा दगड दाखविण्यात आला आहे. ज्याला टेकून बाहुबली बसलेला दिसत आहे. मात्र पहिल्या भागाच्या पोस्टरमध्ये त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा दगड दाखविण्यात आला नाही, उलट तिथे डेडबॉडी दाखविण्यात आली आहे. मात्र दुसºया भागात अचानकच दगड दाखविण्यात आल्याने तो नेमका कोठून आला, असा प्रश्न पडला नसेल तरच नवल. चूक ८) एक वॉर तुकडे अनेकदेवसेना जेव्हा कपड्यांवर तलवार चालविते तेव्हा ते कपडे फाटले जातात. त्यामधूनच तिची पहिली अन् संपूर्ण झलक बघावयास मिळते. मात्र एका वॉरमध्ये त्या कपड्याचे एवढे तुकडे कसे होऊ शकतात, हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे.