Join us

मंदना करिमी 'सुलतान'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:49 IST

बिग बॉस ९ ची स्पर्धक मंदना करिमी ही सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटात भूमिका करू शकते. सलमान खानचा अँक्शन चित्रपट ...

बिग बॉस ९ ची स्पर्धक मंदना करिमी ही सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटात भूमिका करू शकते. सलमान खानचा अँक्शन चित्रपट 'सुलतान' सध्या चर्चेत आहे. नायिकेच्या मुख्य भूमिकेसाठी चित्रपटाचे निर्माते धडपड करीत आहेत. दीपिका पदुकोन, परिणीती चोप्रा आणि कृती सेननच्या अफवांनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस ९ ची स्पर्धक मंदना करिमी ही सलमानसोबत काम करताना दिसू शकते.निर्मात्यांना फ्रेश चेहरा हवा आहे. त्यामुळे मंदनाला हा रोल मिळू शकेल. सध्या तरी ही अफवाच आहे, असे म्हणता येईल कारण अधिकारिकरित्या याची घोषणा झाली नाही. जर मंदना 'सुलतान'च्या मुख्य भूमिकेत असेल तर, तिच्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट असेल. तिने कुणाल खेमूसोबत 'भाग जॉनी' आणि 'क्या सुपर कुल हैं हम ३' चित्रपटात तुषार कपूर आणि अफताब शिवदासानी सोबत काम केले आहे.