Join us  

Birthday Special : कधी स्वत:ला कुरूप समजायची श्रुती हासन, जुने फोटो पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 8:00 AM

सुपरस्टार कमल हासन यांची लेक श्रुती हासन हिचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देखासगी आयुष्यातील अफेअरमुळे श्रुती चर्चेत आली.

सुपरस्टार कमल हासन यांची लेक श्रुती हासन हिचा आज वाढदिवस. बॉलिवूड, टॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने घायाळ करणाºया श्रुतीने सिनेमांसाठी काय नाही केले. होय, अगदी स्वत:च्या पर्सनॅलिटीसोबत स्वत:चा चेहराही बदलला.श्रुतीचे जुने फोटो पाहिल्यानंतर हीच ती श्रुती यावर विश्वास बसणार नाही. होय, श्रुती आधी स्वत:ला कुरूप समजायची.

हा कुरूप चेहरा बदलण्यासाठी अखेर श्रुतीने प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला. खरे तर अनेक नट्या प्लास्टिक सर्जरी केल्याचे लपवतात. पण श्रुतीने अगदी जगजाहिरपणे सर्जरी केल्याची कबुली दिली. ओठांची आणि नाकाची सर्जरी तिने केले. यानंतर मात्र श्रुतीचा चेहरामोहरा बदलला.

आई सारिका आणि वडील कमल हासन यांच्या रूपात घरातून अभिनयाचा वारसा मिळाल्याने श्रुतीनेही याच मार्गावर चालण्याचे ठरवले. श्रुतीला लहानपणापासूनच सिंगींग आणि अ‍ॅक्टिंगमध्ये रूची होती. 2000 साली वडिलांच्याच ‘हे राम’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून झळकली. सायकॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीत शिकण्यासाठी ती कॅलिफोर्नियाला गेली आणि तिथून परतल्यानंतर तिच्या अ‍ॅक्टिंग आणि सिंगींग करिअरला गती मिळाली. तिने अनेक चित्रपटांत गाणी गायलीत.

2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला. पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत.

खासगी आयुष्यातील अफेअरमुळे श्रुती चर्चेत आली. सर्वप्रथम साऊथ स्टार सिद्धार्थसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा झाल्यात. हे दोघे काही काळ लिव्ह-इनमध्येही राहिले. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर साऊथ अ‍ॅक्टर धनुषसोबत आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अर्थात या चर्चा अफचा ठरल्या. मध्यंतरी विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.

टॅग्स :श्रुती हसनकमल हासन